नवी मुंबई : एनएमएमटीने नवी मुंबईत उभारलेले बस थांबे प्रवाशांपेक्षा जाहिरात कंपन्यांना उपयुक्त ठरले आहेत. जाहिरातदारांच्या मर्जीनुसार या थांब्यांची जागा व आराखडा बदलण्याचे काम बिनबोभाटपणो सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे कमी तर जाहिरातदारांचे अधिक हित साधले जात आहे. एकूणच सर्व बस थांबे जाहिरात कंपन्यांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती निर्माण नियमांचे उल्लंघन करणा:या जाहिरात कंपन्यांवर कारवाईचे संकेत एनएमएमटी प्रशासनाने दिले आहेत.
महापालिका कार्यक्षेत्रसह खारघर आणि पनवेल या परिसरात एनएमएमटीने प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल 550 बस शेल्टर अर्थात थांबे उभारले आहेत. हे सर्व बस थांबे चार जाहिरात कंपन्यांना विभागून देण्यात आले आहेत. काहींबरोबर तीन वर्षाचा तर काही कंपन्यांबरोबर 1क् वर्षाचा करार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार एनएमएमटीचे सर्व बस थांबे जाहिरात कंपन्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. त्यामुळे या बस थांब्यांचा मालकीहक्क मिळाल्याच्या अविर्भावात या कंपन्यांचे मालक वावरत आहेत.
याचा परिणाम म्हणून वाटेल तेथे नवीन शेल्टर बांधणो, जाहिराती प्रदर्शनीय करण्यासाठी जुन्या थांब्यांच्या स्वत:च्या सोयीनुसार जागा बदलणो, गरज नसताना पूर्वी असलेल्या थांब्याच्या शेजारी आणखी एक थांबा उभारून त्यावर जाहिराती झळकविणो आदी प्रकार सर्रासपणो सुरू आहेत. वाशी रेल्वे स्थानक ते सेक्टर 17 येथील नवरत्न हॉटेलर्पयतच्या मार्गावर तब्बल 15 बस थांबे आहेत. तशीच परिस्थिती तुर्भे नाका आणि कोपरी येथील आहे.
विशेष म्हणजे यापैकी मोजक्याच थांब्यांचा प्रवाशांसाठी उपयोग होतो. उर्वरित सर्व थांब्यांचा वापर फक्त जाहिरातबाजीसाठी केला जातो. (प्रतिनिधी)
प्रशासनाच्या धोरणानुसारच बस थांब्यांची रचना असावी, अशा संबंधित जाहिरात कंपन्यांना सूचना आहेत. याचे पालन होत नसल्याचे आढळल्यास निश्चितच कारवाई केली जाईल. एनएमएमटीचा एखादा मार्ग बंद केल्यास त्या मार्गावरील सर्व थांबे काढले जातात. तरीही एखाद्या ठिकाणी अनावश्यक बस शेल्टर उभारल्याचे आढळून आल्यास ते काढून टाकले जाईल.
-शिरीष आरदवाड, प्रभारी व्यवस्थापक (एनएमएमटी)
च्एनएमएमटीच्या ताफ्यातील 360 पैकी 280 साध्या, 10 मिनी बस आणि 70 वातानुकूलित बसेस एकूण 44 मार्गावर धावतात. यापैकी महापालिका कार्यक्षेत्रसह खारघर आणि पनवेल या परिसरात एनएमएमटीने प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल 550 बस शेल्टर अर्थात थांबे उभारले आहेत. हे सर्व थांबे चार जाहिरात कंपन्यांना विभागून दिले आहेत.
जाहिरात पॅनेल्सनाच दिले अधिक प्राधान्य
ऊन-पावसात प्रवाशांना आश्रय घेता यावा, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसने तसेच शालेय विद्याथ्र्याची गैरसोय होणार नाही, या अनुषंगानेच बस शेल्टरची रचना असावी, असा नियम आहे. परंतु या नियमाला नवी मुंबईत हरताळ फासल्याचे दिसून आले आहे.
बस शेल्टर उभारताना आतील सुविधांपेक्षा दर्शनी भागातील जाहिरात पॅनेल्सनाच अधिक प्राधान्य दिल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे अधिकाधिक जाहिरातीचे ध्येय समोर ठेवून उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक बसथांबे प्रवाशांसाठी मात्र कुचकामी ठरताना दिसत आहेत.