Join us  

भारतीय वनसेवा परीक्षेत हिंगोलीचे निरंजन दिवाकर राज्यात पहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:45 AM

भारतीय वनसेवा परीक्षेत महाराष्ट्राने बाजी मारली असून १५ मराठी उमेदवार उत्तीर्ण झाले. हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे निरंजन सुभाषराव दिवाकर यांनी राज्यात पहिला तर देशात तिसरा क्रमांक मिळविला

मुंबई : भारतीय वनसेवा परीक्षेत महाराष्ट्राने बाजी मारली असून १५ मराठी उमेदवार उत्तीर्ण झाले. हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे निरंजन सुभाषराव दिवाकर यांनी राज्यात पहिला तर देशात तिसरा क्रमांक मिळविला. तर सुमीतकुमार सुभाषराव पाटील यांनी सातवे स्थान मिळविले.याशिवाय काजोल पाटील (११), श्रीनिवास विनायकराव पाटील (२८), संदीप हिंदुराव सुर्यवंशी (३८), निखील दशरथ थावळ (४६), सुदर्शन गोपीनाथ जाधव (४७), कस्तुरी प्रशांत सुळे (५६), राहुल किसन जाधव (६८), प्रशांत बाजीराव पाटील (६९), अमील लक्ष्मण शिंदे (७३), सतीश अशोक गोंधळी (७९), अक्षय बाळू भोरडे (९५), शंशाक सुधीर माने (१००) आणि राहुल गजबिये (१०२) यांना यश मिळाले.मंगळवारी निकाल जाहीर झाला. परीक्षेत देशभरात ११० उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेनंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये मुलाखती झाल्या होत्या. देशभरातून एकूण ११० उमेदवार उत्तीर्ण झाले. गुणवत्ता यादीत पहिल्या दहा जणांमध्ये राज्यातील दोन उमेदवारांनी बाजी मारली आहे. उत्तीर्णांच्या यादीत ४६ उमेदवार खुल्या प्रवर्गातील, ४० इतर मागासवर्गीय, १६ अनुसूचित जाती, ८ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. त्यातील ३ उमेदवार दिव्यांग आहेत.