मुंबईत नाईट कर्फ्यूला मुदतवाढ नाही; राज्य सरकारच्या आदेशानूसार पुढील भूमिका ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 07:53 AM2021-01-07T07:53:24+5:302021-01-07T07:53:29+5:30

रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती. 

Night curfew in Mumbai not extended; The next role will be decided as per the order of the state government | मुंबईत नाईट कर्फ्यूला मुदतवाढ नाही; राज्य सरकारच्या आदेशानूसार पुढील भूमिका ठरवणार

मुंबईत नाईट कर्फ्यूला मुदतवाढ नाही; राज्य सरकारच्या आदेशानूसार पुढील भूमिका ठरवणार

googlenewsNext

मुंबई : नाईट कर्फ्यूचा कालावधी वाढवण्या संदर्भात राज्य सरकारकडून बुधवारी कुठलीही सूचना न आल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईतील नाईट कर्फ्यू न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याला मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस यांनी दुजोरा दिला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याने ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेत, २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू लागू केला. त्यानुसार, रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती. 

नाईट कर्फ्यूची मुदत संपली असताना, हा कर्फ्यू वाढवण्या संदर्भात राज्य सरकारकडून बुधवारी कुठलीही सूचना न आल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईतील नाईट कर्फ्यू न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे शासनाच्या आदेशानुसार, पुढील भूमिका ठरविण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

Web Title: Night curfew in Mumbai not extended; The next role will be decided as per the order of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.