Join us  

पश्चिम रेल्वेवर उद्या रात्रकालीन ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 5:41 AM

एल्फिन्स्टन रोड स्थानकावर पादचारी पुलाच्या गर्डरसाठी पश्चिम रेल्वेने विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. ४ व ५ मार्च रोजी हा विशेष ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : एल्फिन्स्टन रोड स्थानकावर पादचारी पुलाच्या गर्डरसाठी पश्चिम रेल्वेने विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. ४ व ५ मार्च रोजी हा विशेष ब्लॉक घेण्यात येईल. रविवारी रात्री साडेनऊ ते सोमवारी पहाटे ६ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात डाउन धिम्या मार्गावरील लोकल फेºया जलद डाउन मार्गावर वळविण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील पादचारी पुलासाठी १२ मीटर लांबीचे स्टीलचे गर्डर उभारण्यात येणार आहेत. रविवारी रात्री या गर्डर उभारण्याचे काम हाती घेतले जाणार असून, सोमवारी पहाटे हे काम पूर्ण करण्यात येईल.ब्लॉक काळात डाउन धिम्या मार्गावरील लोकल चर्चगेट-मुंबई सेंट्रल ते माहिम स्थानकादरम्यान डाउन जलद मार्गांवर चालविण्यात येतील.या लोकल महालक्ष्मी, एल्फिन्स्टन रोड आणि माटुंगा रोड स्थानकावर फलाट नसल्यामुळे थांबणार नाहीत, शिवाय ब्लॉक काळात लोअर परळ आणि माहिम स्थानकांवर लोकल फेºयांना दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. काही लोकल फेºया वांद्रे ते चर्चगेट स्थानकांदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने गंतव्य स्थानी पोहोचतील.>३४ फेºया रद्दरविवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटे ते सोमवारी पहाटे ६ वाजेपर्यंत विशेष रात्रकालीन ब्लॉक असेल. ब्लॉक काळात ३८ लोकल फेºया जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे, तर ३४ लोकल फेºया रद्द करण्यात येणार आहेत. यात १७ अप आणि १७ डाउन लोकल फेºयांचा समावेश आहे.>धूलिवंदनात होणाºया पिशव्या आणि फुग्यांच्या फेकीमुळे वातानुकूलित लोकल शुक्रवारी चालविण्यात आली नाही.>पश्चिम रेल्वेवर धावणारहॉलिडे विशेष एक्स्प्रेसमुंबई : सलग येणाºया सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी पश्चिम रेल्वेने ‘हॉलिडे’ विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्रे टर्मिनस-अजमेर, वांद्रे टर्मिनस-पटना या मार्गावर प्रत्येकी १ फेरी हॉलिडे विशेष म्हणून चालविण्यात येणार आहे.ट्रेन क्रमांक ०९६२२ वांद्रे टर्मिनस-अजमेर विशेष एक्स्प्रेस ५ मार्च रोजी पहाटे ६ वाजून १५ मिनिटांनी रवाना होणार असून, अजमेर येथे दुसºया दिवशी मध्यरात्री ३ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे. ट्रेन क्रमांक ०९६२१ अजमेर-वांद्रे एक्स्प्रेस ४ मार्च रोजी अजमेर येथून पहाटे ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, वांद्रे टर्मिनस येथे दुसºया दिवशी पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल, तर ट्रेन क्रमांक ०९०११ वांद्रे टर्मिनस-पटना विशेष एक्स्प्रेस ६ मार्च रोजी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार आहे. या एक्स्प्रेसचा परतीचा प्रवास (०९०१२) ८ मार्च रोजी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी पटना स्थानकातून होईल.>पनवेल-मडगाव मार्गावर विशेष रेल्वेमुंबई : प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेने पनवेल-मडगाव मार्गावर २ विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या शनिवारी रात्री चालविण्यात येतील. सलग सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावरील विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सुखद होईल, असा विश्वास मध्य रेल्वे व्यक्त करत आहे.कोकणात होळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी जातात. कोकणातील काही भागांत होळी सण ३ दिवस, तर काही भागांत ५ दिवस साजरा करण्यात येतो. परिणामी, प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने शनिवारी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०२५ ही विशेष रेल्वे पनवेल येथून रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून, ही मडगाव येथे दुसºया दिवशी दुपारी ११ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे, तर गाडी क्रमांक ०१०२६ मडगाव येथून शनिवारी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे.पनवेल येथे त्याच दिवशी रात्री ११ वाजता पोहोचेल. ही गाडी रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल. या रेल्वेमध्ये ३ वातानुकूलित ३ टायर, १२ शयनयान बोगी आणि ६ द्वितीय दर्जाच्या बोगी असणार आहेत. या रेल्वेमधील द्वितीय दर्जाच्या बोगी अनारक्षित म्हणून असतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

 

टॅग्स :रेल्वे प्रवासीलोकल