Join us  

पश्चिम रेल्वेवर आज घेण्यात येणार रात्रकालीन ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 6:18 AM

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावर आणि रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत डाउन धिम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान वसई रोड ते विरार दरम्यानची अप आणि डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाउन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे.

टॅग्स :रेल्वे प्रवासी