Join us  

हॉटेल थांब्यावर एसटी आकारणार नवा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 6:13 AM

एसटी महामंडळाने प्रवासादरम्यान थांबा घेणाऱ्या ठिकाणी हॉटेल चालकांकडून जादा दर आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : एसटी महामंडळाने प्रवासादरम्यान थांबा घेणाऱ्या ठिकाणी हॉटेल चालकांकडून जादा दर आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ २५ मेपासून मुंबई-पुणे-मुंबई महामार्गावर चालविण्यात येणाºया शिवशाही, निमआराम गाडी आणि एसटी गाड्यांना लागू करण्यात आली आहे.शिवनेरी, शिवशाही, निमआराम आणि साध्या एसटीसाठी वेगवेगळे दर हॉटेल चालकांकडून आकारले जाणार आहेत. त्यामुळे हॉटेल चालकांना एसटी महामंडळाला थांब्यासाठी नव्या दराप्रमाणे पैसे द्यावे लागणार आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील थांब्यासाठी एसटीने नवे दरपत्रक जाहीर केले आहे. यापूर्वी शिवनेरी आणि शिवशाहीसाठी आधी २३६ रुपये आकारले जात होते. आता २६० रुपये आकारले जाणार आहेत. निमआराम गाड्यांसाठी आधी १८९ ऐवजी २०८ रुपये तर साध्या एसटीसाठी आता १४२ ऐवजी १५६ रुपये आकारले जाणार आहेत.