Join us  

घोडा बांधण्याची परवानगी मागणाऱ्या लेखाधिकाऱ्याचं जिल्हाधिकाऱ्यांना नवं पत्र

By महेश गलांडे | Published: March 03, 2021 7:27 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी कार्यालयं बंद होतं. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर अनेक जण घरूनच कामही करत होते.

ठळक मुद्देकार्यालयीन परीसरात घोडा बांधण्यासाठी, मी अर्ज दिला होता. तरी, या अर्जाद्वारे संदर्भीय अर्ज मागे घेत आहे, असे सतिश देशमुख यांनी म्हटलंय. त्यामुळे, घोडा बांधण्यासाठीचा अर्ज मागे घेण्यात आला आहे.

नांदेड/मुंबई - नांदेडच्या सहायक लेखाधिकाऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे घोडा बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सहायक लेखाधिकाऱ्याने जिल्हाधिकारी यांना आता आणखी एक अर्ज केला आहे. त्यामुळे, नांदेडमधील या अर्जाची चांगलीच चर्चा रंगली आहे. सतीश देशमुख असं या कर्मचाऱ्याचं नाव असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ते सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहेत. आपल्याला पाठीचा त्रास होत असल्यामुळे कार्यालयात दुचाकीवरून येण्यास समस्या निर्माण होत असल्याचं त्यांनी पहिल्या पत्रात नमूद केलं होतं. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी कार्यालयं बंद होतं. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर अनेक जण घरूनच कामही करत होते. परंतु जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला, तसतशी कार्यालयं पुन्हा सुरूही झाली आणि कर्मचारी हळूहळू आपल्या कार्यालयांमध्ये रूजूही होऊ लगाले. दरम्यान, सध्या एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात कर्मचाऱ्यानं चक्क कार्यालयात आपण घोड्यावरून येणार असून घोडा उभा करण्यासाठी जागा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यानं चक्क जिल्हाधिकारी कार्यालयालाच पत्र लिहिलं. मात्र, आता नवीन पत्र लिहून आपण आपली अर्ज मागे घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

कार्यालयीन परीसरात घोडा बांधण्यासाठी, मी अर्ज दिला होता. तरी, या अर्जाद्वारे संदर्भीय अर्ज मागे घेत आहे, असे सतिश देशमुख यांनी म्हटलंय. त्यामुळे, घोडा बांधण्यासाठीचा अर्ज मागे घेण्यात आला आहे. सतिश यांनी नेमका कशामुळे हा अर्ज केला आणि पहिला अर्ज मागे घेतला याबाबत चर्चा व तर्कवितर्कांना उधाण आले आहे.      

आजच केला होता पहिला अर्ज

दुचाकीवरून कार्यालयात येण्यासाठी त्रास होत असल्यानं आपण घोडा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घोड्यावर बसून विहित वेळेत कार्यालयात येणं आपल्याला शक्य होईल आणि घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्यासाठी परवानगी देण्याची विनंतीही त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. त्यांनी ३ मार्च रोजीच हे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला लिहिलं आहे. सध्या त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

टॅग्स :नांदेडमुंबईजिल्हाधिकारी