नेट आवडे सर्वांना; बंगळुरूनंतर मुंबईची आघाडी, ९४ टक्के मुंबईकर घरबसल्या करतात उपयाेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 06:48 AM2020-10-29T06:48:52+5:302020-10-29T07:48:12+5:30

Mumbai Internet News : मुंबईचा विचार करता २० ते २९ या वयोगटातील तरुणांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण ३१ टक्के आहे. त्याखालोखाल २३ टक्के इंटरनेट वापरकर्ते हे ३० ते ३९ या वयाेगटातील आहेत.

Net likes everyone; Mumbai leads after Bangalore, 94% of Mumbaikars use it at home | नेट आवडे सर्वांना; बंगळुरूनंतर मुंबईची आघाडी, ९४ टक्के मुंबईकर घरबसल्या करतात उपयाेग

नेट आवडे सर्वांना; बंगळुरूनंतर मुंबईची आघाडी, ९४ टक्के मुंबईकर घरबसल्या करतात उपयाेग

Next

मुंबई - तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर वाढला असून आजघडीला २० ते २९ या वयोगटाकडून सर्वाधिक इंटरनेटचा वापर केला जातो. देशभरात हे प्रमाण ३४ टक्के आहे. शहरी भागात ते ३३ तर ग्रामीण भागात ३६ टक्के आहे. 

मुंबईचा विचार करता २० ते २९ या वयोगटातील तरुणांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण ३१ टक्के आहे. त्याखालोखाल २३ टक्के इंटरनेट वापरकर्ते हे ३० ते ३९ या वयाेगटातील आहेत. बंगळुरूनंतर मुंबईच्या  जोडीला हैदराबाद हे शहर इंटरनेट वापरात आघाडीवर आहे. त्याखालोखाल कोलकाता, पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबाद ही शहरे आहेत.

इंटरनेट ॲण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या इंडिया इंटरनेट रिपोर्ट-२०१९ नुसार, १२ ते १५ या वयोगटाकडून वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटचा विचार करता देश स्तरावर हे प्रमाण १४ टक्के, शहरात ११ आणि ग्रामीण स्तरावर १६ टक्के आहे. देशात ५० वर्षांवरील ६ टक्के, शहरी स्तरावर ९ आणि ग्रामीण स्तरावर ४ टक्के नागरिक इंटरनेट वापरतात. हळूहळू ग्रामीण भागातही इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढीस लागणा असल्याचे निदर्शनास येत आहेे 

मुंबईत १६ ते १९ वयोगटातील ११ टक्के, १२ ते १५ वयोगटातील ९ टक्के, ४० ते ४९ वयोगटातील १४ टक्के तर ५० वर्षांवरील १२ टक्के नागरिक हे इंटरनेटचा सरार्स वापर  करत असल्याचे समाेर आले आहेे.   

प्रवासादरम्यान ५१ टक्के बघतात इंटरनेट
९४ टक्के मुंबईकर घरबसल्या इंटरनेट वापरतात.
३८ टक्के कामावर वापरतात.
५१ टक्के प्रवासादरम्यान इंटरनेट बघतात.
१० टक्के वापर हा अभ्यासासाठी केला जाताे.
४ टक्के लाेक हे कॅफेमध्ये इंटरनेटचा वापर करतात.
 

Web Title: Net likes everyone; Mumbai leads after Bangalore, 94% of Mumbaikars use it at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.