Join us  

कुपोषण कमी होण्यासाठी पंचसूत्रीची आवश्यकता - दीपक सावंत

By मनोहर कुंभेजकर | Published: July 15, 2023 3:21 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून डॅा दीपक सावंत यांची या टास्क फोर्सवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यावर कुपोषणग्रस्त भागांची पाहाणी करण्यासाठी त्यानी पालघर व मेळघाटाचा दौरा केला.

मुंबई-राज्यात कुपोषणाचे प्रमाण जरी कमी झालेले असले तरी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये प्रसूतीचे प्रमाण जास्त असते. पर्यायाने उपजत मृत्यू पहिल्या काही दिवसातील अर्भक मृत्यू जास्त होतात त्यासाठी प्रत्येक प्रसूती मॅानीटर करणे आवश्यक आहे असंल्याचे मत राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले. पावसाळयात वीज , नेटवर्क हे अतिशय वाईट असते , संपर्क करणे दूरापास्त होते रस्ते खराब असल्याने पुरामुळे पाड्याची संपर्क तुटल्याने गर्भार माता किंवा आजारी बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यन्त पोहोचू शकत नाही अशी माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून डॅा दीपक सावंत यांची या टास्क फोर्सवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यावर कुपोषणग्रस्त भागांची पाहाणी करण्यासाठी त्यानी पालघर व मेळघाटाचा दौरा केला. आपला या दौऱ्यांचा अहवाल आपण मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुपोषणाला आळा घालण्यासाठी त्या गावांच्या सरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी ए.एन.एम् यांनी आपल्या स्तरावर माहीती घेऊन त्याना इन्टीटयूशनल प्रसूतीसाठी प्रवृत करून प्रसूत निर्धोक कशी होईल त्यासाठी या पाच जणानी आठवड्याला आढावा घ्यावा.या पाच जणांची भूमिका मोठी असून या पंचसूत्राच्या माध्यमातून कुपोषण रोखू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच भूमका वैदू पडियार मांत्रीक याचा हस्तक्षेप होणार नाही हे पाहाणे गरजेचे आहे. बाळ किंवा माता वेळेत पोहोचेल आणि उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी त्याचे समुपदेशन करून त्याना मुख्य प्रवाहात आणावे. तसेच अंगणवाडीत दिला जाणारा आहार कुपोषित बालकासाठी पचण्यास त्रास होतो.त्यामुळे सीटीसी मध्ये सुरूवातीला झालेली वजनात वाढ ही जुलाब झाल्याने टिकत नाही.त्यामुळे पुन्हा एकदा आहाराच्या न्युट्रीशिनल व्हॅल्यूज लक्षात घेऊन पुन्हा आहाराचा सॅम मॅम गटासाठी तक्ता बनवावा. हायपोथर्मिया नवजात शिशूमधे टाळण्यास वॅार्मर असावेत व ते चालण्यास वीज पुरवंठा सातत्याने असावा. मेळंघाटात सेमाडोह ,हतरू यासारख्या ३० गावात वीज नाही  यासाठी प्रयत्न होऊन वनविभागाची अडचण मुख्यमंत्र्यांनी दूर करावी अशी सूचना डॅा दीपक सावंत यांनी केल्या. या सर्व बाबी लक्षात घेउन आपण सांघिक प्रयत्नाने कुपोषण कमी करून मृत्यू कमी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :दीपक सावंतमुंबई