विमा क्षेत्रातील फसवणुकीविरोधात संघर्ष करण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:32 AM2019-09-15T06:32:49+5:302019-09-15T06:32:56+5:30

विमा क्षेत्राला बसत असून, यातून मार्ग काढण्यासाठी लोक, प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाद्वारे फसवणुकीविरुद्धचा लढा पुनर्जीवित करण्यासाठी ‘लोकमत इन्शुरन्स समिट’चे आयोजन करण्यात आले आहे.

Need to fight against insurance fraud in the insurance sector | विमा क्षेत्रातील फसवणुकीविरोधात संघर्ष करण्याची गरज

विमा क्षेत्रातील फसवणुकीविरोधात संघर्ष करण्याची गरज

Next

मुंबई : आर्थिक क्षेत्रातील घोटाळे आणि फसवणुकीचा फटका विमा क्षेत्राला बसत असून, यातून मार्ग काढण्यासाठी लोक, प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाद्वारे फसवणुकीविरुद्धचा लढा पुनर्जीवित करण्यासाठी ‘लोकमत इन्शुरन्स समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. विमा क्षेत्रातील फसवणुकीला लगाम घालण्यासह यावर उपाययोजना करणे हा या परिषदेमागचा मुख्य उद्देश असून, १९ सप्टेंबर रोजी हॉटेल सहारा स्टार येथे ही परिषद होईल.
गेल्या दशकभरात विमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली असून, जागतिक विमा कंपन्या भारतीय बाजारपेठेत संधी शोधत आहेत. मध्यमवर्गातील वाढती लोकसंख्या, विमा जागरूकता, गुंतवणुकीत होणारी वाढ, पायाभूत सुविधांवर होत असलेला खर्च या घटकांमुळे भारतात विमा कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मात्र हे होत असतानाच दुसरीकडे या क्षेत्रातील फसवणूक, घोटाळे
याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विम्याचे हप्ते ग्राहकांसाठी महाग झाले आहेत.
आयआरडीएचे माजी सदस्य नीलेश साठे, एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक विभा पडळकर, पीएनबी मेटलाइफचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार श्रीवास्तव, भारती एक्सा लाइफ इन्शुरन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ईशिता मुखर्जी,
बजाज अलियान्झ जनरल विमाचे इन्व्हेस्टिगेशन प्रमुख संजीव द्विवेदी, रिलायन्स निप्पोन लाइफ इन्शुरन्सचे सीएसओ सुंदर कृष्णन, अविवा लाइफ इन्शुरन्सच्या ग्राहक सेवा विभागाचे प्रमुख अमित मलिक आणि आयसीआयसीआय प्रूडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे सीआरसीओ दीपक किंजर आदी मान्यवर परिषदेत सहभागी होणार आहेत.
लोकमत विमा समिटमध्ये एसबीआय लाइफ, प्रेझेंटिंग पार्टनर, एचडीएफसी-पॉवर्ड बाय पार्टनर, एक्सपिरियन-अ‍ॅनालिटिकल पार्टनर, श्रीराम जनरल इन्शुरन्स-सपोर्र्टिंग पार्टनर आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स-सपोर्र्टिंग पार्टनर यांचा सहभाग असेल. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ७६२०९२३३०६ आणि ९१३७१२१६१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
>परिषदेत या विषयांवर होणार चर्चा
फसवणूक ओळखण्यात नियामकांचा सहभाग आणि सहकार्य
संयुक्त बिग डेटा उपक्रमाची आवश्यकता
ब्लॉक चेन, आयओटीची संभाव्यता
फसवणुकीविरोधात लढ देण्यासाठीचे तंत्रज्ञान
एआय आणि प्रगत अ‍ॅनालिटिक्स तंत्रज्ञान
सायबर सिक्युरिटी, डिजिटल क्लेम प्रोसेसिंगद्वारे फायदा करून घेणे

Web Title: Need to fight against insurance fraud in the insurance sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.