अशोक पाटील - कुडूस
वाडा तालुक्यात डी प्लस झोनद्वारे कारखानदारी आली. येथील औद्योगिक विकासाला चालना मिळाली. वाढती कारखानदारी आणि लोकसंख्येमुळे रस्ते, पाणी, स्वच्छता, निवारा यांचा प्रश्न निर्माण झाला. काही प्रमाणात या प्रश्नांवर मात केली. मात्र, कारखानदारीच्या सुरक्षेचा विचार तितक्या प्रमाणात झाला नाही. त्यामुळे कारखान्यांमधील आगीत त्यांची राख झाली. अनेक जीवांचा बळी गेला. कोटय़वधी रुपयांचा चुराडा झाला. आजही कारखानदारी सुरक्षेविना बेजार आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र अगिAशमन दलाची यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाडा तालुक्यातील सर्वच गावांतून कारखानदारी वाढली आहे. कंपन्यांमधून लागणा:या आगी गावांनाही घातक ठरू लागल्याने तालुक्यात अगिAशमन केंद्राची मागणी जोर धरीत आहे. अगिAशमन केंद्र नसल्याने कारखानदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वारंवार कारखाने आगीच्या भक्षस्थानी पडत असताना जवळ अगिAशमन यंत्रणा नसल्याने भिवंडी, वसईतून यंत्रणा येता-येता कारखान्याची राख होते. काही वर्षापूर्वी वडवळीतील ओनिडा कंपनीच्या गोदामाला आग लागून लाखोंचे टीव्ही संच जळून खाक झाले होते. चिंचघर येथील जेआयके रासायनिक कंपनीच्या रिअॅक्टरचा स्फोट होऊन संपूर्ण कंपनी जळाली होती. याची झळ डोंगस्ते, चिंचघर गावांतील काही घरांनाही बसली होती. घोणसईतील गुजरात कलर या कंपनीतही स्फोट होऊन आग लागल्याने कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले. वाडा शहरातील विजय सॉ मिल या गिरणीत आग लागून कोटय़वधींचे नुकसान झाले. बिलावलीतील जयपॉलिमर्स ही कंपनीही अशीच आगीत जळून खाक झाली. याशिवाय, कोनसईतील प्यारेलाल फोम, बॅण्जो ऑरगॅनिक या मुसारणो येथील कंपनीच्या आगीतही करोडोंचे नुकसान झाले होते. दोन वर्षापूर्वी वाडय़ातील फटाके गोदामाला आग लागून शेजारची 9 दुकाने आगीत भस्मसात झाली. कोंढले येथील फायब्रॉल नॉन आईनिक्स या कंपनीच्या आगीत तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. या आगीची झळ कोंढले, म्हसवळ, जांभूळपाडा या गावांना बसली होती. गाव रिकामे करावे लागले होते. बांधणपाडय़ातील वसुमती प्रिंट अॅण्ड पॅकेजिंग या कंपनीच्या आगीतही कंपनी जळून खाक झाली होती. त्यातही कंपनीचे एक कोटीहून अधिक नुकसान झाले होते. खुपरीतील एक कंपनी जळून खाक झाल्यानंतर अगिAशमन यंत्रणा दोन तासांनी येथे आली होती. गणपती विसजर्नासाठी वैतरणा नदीवर गेलेले तिघे तरुण अचानक आलेल्या पाण्यात वाहून गेले.