भरती परीक्षेच्या नियोजनातील गोंधळावर रोहित पवार संतापले; सरकारकडे केली महत्वाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 06:02 PM2021-10-17T18:02:35+5:302021-10-17T18:02:44+5:30

वेगवेगळ्या पदांची परीक्षाही एकाच वेळेत आली आहे. त्यामुळे दोन पदांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे.

NCP Leader Rohit Pawar angry over confusion in recruitment health department; Important demands made to the government | भरती परीक्षेच्या नियोजनातील गोंधळावर रोहित पवार संतापले; सरकारकडे केली महत्वाची मागणी

भरती परीक्षेच्या नियोजनातील गोंधळावर रोहित पवार संतापले; सरकारकडे केली महत्वाची मागणी

Next

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील भरतीच्या परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच आहे. विविध पदांसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. यात वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, विविध संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी, एकाच वेळेत ठेवण्यात आली आहे. शिवाय अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. 

वेगवेगळ्या पदांची परीक्षाही एकाच वेळेत आली आहे. त्यामुळे दोन पदांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. यात काहींना दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदरवांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्यात, अशी विनंती केली आहे. 

रोहित पवार ट्विटरद्वारे म्हणाले की, एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. 

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

आरोग्य विभागात गोंधळ- 

एका उमेदवाराला गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल पदाच्या परीक्षेसाठी २४ ऑक्टोबरला औरंगाबादेतील खाराकुंवा केंद्र देण्यात आले आहे. तर त्यालाच सांख्यिकी अन्वेषक पदासाठी अहमदनगर केंद्र देण्यात आले आहे. एक परीक्षा सकाळी सकाळी १० ते दुपारी १२ तर दुसरी  त्याच दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. 

Web Title: NCP Leader Rohit Pawar angry over confusion in recruitment health department; Important demands made to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.