Join us  

एनसीबीची डोंगरीसह पुण्यात छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:07 AM

मुंबई : कुख्यात माफिया दाऊद इब्राहीम याचे एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात अमली पदार्थ नियंत्रण कक्षची (एनसीबी) ...

मुंबई : कुख्यात माफिया दाऊद इब्राहीम याचे एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात अमली पदार्थ नियंत्रण कक्षची (एनसीबी) छापेमारी सुरूच आहे. शनिवारी दाऊदचा हस्तक व ड्रग्ज तस्कर चिकू पठाणचा सहकाऱ्याच्या पुण्यातील खडकवासला परिसरात एका घरी छापा टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

डोंगरीतून जप्त केलेल्या मिळालेल्या ड्रग्जची तपासणी करण्याचे काम शनिवारीही सुरू होते. येथील नूर मझील या इमारतीतून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करत ‘एम.डी.व ते बनवण्यासाठी आवश्यक रसायनांचा साठा जप्त केला. कारवाईदरम्यान दोन कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि अद्ययावत शस्त्रसाठाही पथकाने हस्तगत केला आहे.

या कारखान्यात अमली पदार्थ तयार करून विकणारे दोन आरोपी, त्यांचे साथीदार दाऊद इब्राहिम व कुख्यात तस्कर करिम लाला यांच्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंमली पदार्थ उत्पादन, विक्रीत गुंतलेल्या या संपूर्ण टोळीस जेरबंद करण्यासाठी दक्षिण मुंबईवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार(कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण याला अटक केल्यानंतर त्याचा साथीदार आरिफ भुजवाला ताब्यात घेतले. त्याच्या नूर मंझिल इमारतीतील घरातून ड्रग्जचा मोठा साठा, दोन कोटी १८ हजारांची रोकड जप्त केला आहे. गेल्या ५ वर्षात या गोरख धंद्यातून १५०० कोटींवर रक्कम डी गँगने मिळविली असल्याचे सांगितले जाते. शनिवारी एनसीबीच्या एका पथकाने चिकू पठाणच्या पुण्यातील हस्तकाच्या घरी छापा टाकण्यात आला. त्याठिकाणाहून महत्त्वपूर्ण ऐवज जप्त केल्याचे सांगण्यात आले.