“सत्य तुमच्या बाजूने असते, तिथे भीती नसते”; अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 04:31 PM2021-11-10T16:31:11+5:302021-11-10T16:31:56+5:30

अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका टीकेला नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक खान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

nawab malik daughter nilofer malik khan replied amruta fadnavis over allegations | “सत्य तुमच्या बाजूने असते, तिथे भीती नसते”; अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचे प्रत्युत्तर

“सत्य तुमच्या बाजूने असते, तिथे भीती नसते”; अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचे प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यापासून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. यानंतर आता नवाब मलिकांनी (Nawab Malik) देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) मोर्चा वळवल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोप नवाब मलिकांनी केला होता. तसेच मलिकांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यावरही आरोप केले. यानंतर अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका टीकेला नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक खान (Nilofer Malik Khan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

नवाब मलिक यांच्या आरोपांना अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते. यानंतर आता नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये कुटुंबातील सदस्यांनीही सहभाग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक खान यांनी पलटवार केला आहे. 

सत्य तुमच्या बाजूने असतं तेव्हा तिथे भीती नसते

बिघडलेल्या नवाबांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद घेतल्या. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे!, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. त्याला निलोफर मलिक खान यांनी थेट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. जर आपल्याकडे काही लपवण्यासारखे नसेल तर त्यांना पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असतं तेव्हा तिथे भीती नसते. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच एकमेव आमचा अजेंडा आहे, असे ट्विट निलोफर मलिक खान यांनी केले आहे. 

दरम्यान, पुरुष असाल तर माझ्यामार्फत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नका, या शब्दांत घणाघाती हल्लाबोल अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केला होता. माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुम्ही जे आरोप करत आहात त्याबद्दल मी परत एकदा सागंते की, आम्ही स्वतंत्र व्यक्ती आहोत, आमची वेगळी ओळख आहे. जर माझ्या अंगावर कुणी आले तर मी त्याला सोडणार नाही. कारण, मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि खोट्याची साथ देणाऱ्याला देखील नाही सोडत. हे सगळे जाणीवपूर्वक केले जात आहे. आमच्याकडे भूखंड, साखर कारखाने असे काहीच नाही. त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही, असा पलटवार अमृता फडणवीस यांनी केला होता.
 

Web Title: nawab malik daughter nilofer malik khan replied amruta fadnavis over allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.