Navneet Rana: ... तर हे असंय, संजय राऊतानी शेअर केली नवनीत राणांविरुद्धची FIR ची कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 05:49 PM2022-04-28T17:49:49+5:302022-04-28T17:50:54+5:30

मी अनुसूचित जातीची सदस्य आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता.

Navneet Rana: ... So this is unreasonable, Sanjay Rautani shared a copy of the FIR against Navneet Rana | Navneet Rana: ... तर हे असंय, संजय राऊतानी शेअर केली नवनीत राणांविरुद्धची FIR ची कॉपी

Navneet Rana: ... तर हे असंय, संजय राऊतानी शेअर केली नवनीत राणांविरुद्धची FIR ची कॉपी

googlenewsNext

मुंबई - सध्या कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी मागासवर्गीय जातीची आहे. संजय राऊत वारंवार माझ्याविरोधात बोलतात. वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊन मला त्रास देतात, असं राणांनी पत्रात नमूद केलं आहे. त्यानंतर, आता संजय राऊत यांनी ट्विटरवरुन नवनीत राणा यांनी कशी फसवणूक केली. त्यांनी जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवले, यासंदर्भातील 2013 साली गुन्हा नोंद झाल्याची एफआयआर कॉपीच शेअर केली आहे. 

मी अनुसूचित जातीची सदस्य आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. 2014 मध्ये मी पहिल्यांदा शिवसेना उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर शिवसेना उमेदवार, कार्यकर्ते मला धमकावू लागले. मी चांभार जातीची असल्यानं माझ्या जातीवरून खोटे आरोप करू लागले, असं राणांनी पत्रात म्हटलं आहे. राणांनी केलेल्या आरोपानंतर आता संजय राऊत यांनी नवनीत राणांविरुद्ध 30 जुलै 2013 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याची एफआयआर कॉपी शेअर केली आहे. त्यामध्ये, नवनीतकौर हरभजनसिंग कुंडलेस उर्फ नवनीत राणा यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. 


हरभजनसिंग कुंडलेस यांनी शाळा सोडल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानुसार, मोची जातीच दाखल प्राप्त केल्याचं या फिर्यादीत म्हटले आहे. खासदार संजय राऊत यांनी जातीच्या प्रमाणपत्र मिळवल्यावरुन दाखल फिर्यादीची एफआयआर कॉपीच शेअर केली आहे.

नवनीत राणांचा संजय राऊतांवर आरोप

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. तेव्हापासून संजय राऊत माझ्याविरोधात बोलत आहेत. मी अनुसूचित जातीची आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच ते वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊन मला त्रास देतात. गेल्या दोन दिवसांत त्यांनी मला आणि माझ्या पतीला बंटी आणि बबलीला म्हटलं. माझ्या समाजाला बदनाम करण्यासाठी त्यांनी मला आणि माझ्या पतीला 420 देखील म्हटलं, अशा शब्दांत राणांनी राऊतांची तक्रार केली आहे.

Web Title: Navneet Rana: ... So this is unreasonable, Sanjay Rautani shared a copy of the FIR against Navneet Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.