Join us  

नालेसफाईच्या नावाने ‘शिमगा’च, केवळ २५ टक्के कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 7:17 AM

मे महिना सुरू झाला, तरीदेखील मुंबई महापालिकेने नालेसफाईच्या कामी अद्याप वेग पकडलेला नाही. परिणामी, लोकप्रतिनिधींकडून मुंबई महापालिकेवर टीका केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक नालेसफाई करण्यात आली नाही, तर पावसाळ्यात मुंबापुरीची पुन्हा तुंबापुरी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई  - मे महिना सुरू झाला, तरीदेखील मुंबई महापालिकेने नालेसफाईच्या कामी अद्याप वेग पकडलेला नाही. परिणामी, लोकप्रतिनिधींकडून मुंबई महापालिकेवर टीका केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक नालेसफाई करण्यात आली नाही, तर पावसाळ्यात मुंबापुरीची पुन्हा तुंबापुरी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, अद्याप केवळ २५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे उर्वरित कामे कधी मार्गी लागणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे.प्रशासकीय माहितीनुसार, कंत्राट पद्धतीच्या नालेसफाईच्या कामांसाठी १५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या वर्षी मोठ्या नाल्यांतून ४ लाख ९४ हजार ७३९ टन गाळ काढण्यात येणार आहे. यापैकी ३ लाख ४६ हजार ३१८ टन गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यात येणार आहे. उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येणार आहे. छोट्या नाल्यांतून पावसाळ्यापूर्वी २ लाख २३ हजार ५७० टन गाळ काढण्यात येणार आहे. उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येईल. नालेसफाईची कामे वेगाने होत नसल्याच्या कारणास्तव यापूर्वीच महापालिका प्रशासनावर टीकास्त्र उगारण्यात आले होते. राजकीय पक्षांसह स्वयंसेवा संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रशासनाकडून होत असलेली नालेसफाई समाधानकारक होत नसल्याचे म्हटले होते.पावसाळ्यात पाणी साचून तलावसदृश्य स्थिती निर्माण होते. त्यामुळे वाहतूक कोलमडण्यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागते. साचलेल्या पाण्याचा निचराही होत नाही. ठिकठिकाणी बसविण्यात आलेले उपसा पंप कुचकामी ठरल्याने, मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ होते. भायखळा, चिंचपोकळी, वरळी, दादर हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केटसह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सखल भाग, मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो, कमानी सिग्नल या व्यतिरिक्त विद्याविहार बस स्थानक परिसर, पश्चिम उपनगरात मिलन सब वे, अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरासह पश्चिम उपनगरातील सखल भागांत पावसाळ्यात पाणी साचते.कंत्राटदार मिळेनातमुंबई महापालिकेने पावसाळ्याचा विचार करत, एप्रिल महिन्याच्या आरंभीच नालेसफाईच्या कामाचा श्रीगणेशा केला आहे. मात्र, महिनाभरात नाल्याची सफाई करण्यात पालिकेला यश आलेले नाही. मोठ्या आणि छोट्या नाल्यांचा विचार करता, छोट्या नाल्यांच्या साफसफाईसाठी कंत्राटदार मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी, छोट्या नाल्यांच्या सफाईला मुहूर्त कधी मिळणार हे गुलदस्त्यातच आहे.कचरा उचलीबाबतही निष्काळजीपणादुसरीकडे, सामाजिक सेवाभावी संस्थाचे लोक उपलब्ध असले, तरी हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाला वेग कधी येणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. नालेसफाईचा मुद्दा चिघळला असतानाच, गटारे साफ करताना लगत टाकण्यात आलेला कचरा उचलण्याबाबत महापालिकेने निष्काळजीपणा बाळगला आहे. कशीबशी २५ टक्के नालेसफाई करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात मात्र हा आकडा २० टक्क्यांच्या आसपास आहे.कंत्राटदाराचे उखळ पांढरे?च्महापालिका नालेसफाईचे नाही, तर कंत्राटदाराचे उखळ पांढरे करत आहे, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.च्पाणी उपसण्यासाठीच्या पंपाचा खर्चही तिप्पट झाला आहे. नालेसफाईच्या नावाने शिमगा सुरू असतानाच मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी खोदकामांनी सपाटा लावला आहे.च्परिणामी, येत्या पावसाळ्यात पुन्हा मुंबापुरीची तुंबापुरी होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.च्रेल्वे स्थानक परिसर, मंडई, चित्रपट/ नाट्यगृहे या वर्दळीच्या ठिकाणांसह पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांवरील मॅनहोलच्या झाकणांखाली जाळ्या बसविण्यात आल्या आहेत का आणि मॅनहोलवर झाकणे असल्याची खात्री करून घ्यावी, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.च्दुसरीकडे नालेसफाईची ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पूर्ण होतील, असा विश्वास महापालिका व्यक्त करत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाबातम्या