Join us  

नायर रुग्णालय रक्तसाठ्यात ठरले अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:30 AM

अकरा महिन्यांचा आढावा; दुसऱ्या क्रमांकावर केईएम, जे़जे़, सायन, भाभा रुग्णालयांचा नंबर

मुंबई : शहर उपनगरातील रुग्णांना रक्त पुरविण्याची मोठी जबाबदारी शासकीय व पालिकेच्या रुग्णालयांवर असते. त्यामुळे खासगी रक्तपेढ्यांसह या रक्तपेढ्या रक्तसाठ्यासाठी अविरत मेहनत घेत असतात. या रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याचे वितरण रुग्णांच्या गरजेनुसार होत असते. यंदा ११ महिन्यांत पालिका रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांचा आढावा घेतला असता पालिकेचे नायर रुग्णालय रक्तसाठ्यात अव्वल असल्याचे दिसून आले आहे.ई रक्तकोष पोर्टलवर नुकतेच रक्तगटांच्या उपलब्धतेची पाहणी करण्यात आली. यातील माहितीनुसार, नायर रुग्णालय रक्तपेढीत सात रक्तगटांची ९७ युनिट उपलब्धता असल्याचे दिसून आले. यात बी पॉजिटिव्ह २६, ए पॉजिटिव्ह १७, ओ पॉजिटिव्ह ३७, एबी पॉजिटिव्ह १, ए नेगेटिव्ह ८, एबी पॉजिटिव्ह ६, बी नेगेटिव्ह २ असे मिळून ९७ युनिट रक्ताची उपलब्धता ईरक्त कोष वेबपोर्टलवर उपलब्ध असल्याचे दिसून आले. तर त्यापाठोपाठ केईएम रुग्णालयाचा क्रमांक येत असून त्यानंतर जेजे, सायन, भाभा आदी रुग्णालयांच्या रक्तपेढ्या येत होत्या. मात्र, याच दिवशी गोकुळदास तेजपाल रुग्णालयात त्या दिवशी रक्त उपलब्ध नसल्याचे दिसून आले.मुंबईत दोन लाख २॰ हजार एवढे युनिट रक्त प्रतिवर्षी संकलित होणे अपेक्षित आहे. मात्र, मुंबईमध्ये राज्यातील इतर भागातून तसेचअन्य राज्यातून येणाºया रुग्णांची संख्या पाहता आणि त्यांना लागणाºया रक्ताची गरज लक्षात घेता स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण ९६.४४ टक्के आहे.रक्ताची उपलब्धता:केईएम रुग्णालय - ३१जे जे रुग्णालय - २७राजावाडी - ५सायन - ६सेंट जॉर्ज - ४भाभा - २मनपा रुग्णालये मुंबई बाहेर जाऊनही रक्तदान शिबिरे घेत आहेत. रक्त पुरवठ्याचा साठा विशिष्ट ठेवता येईल याकडे नायर रुग्णलायाचा कटाक्ष राहिला आहे. रक्तदान करणाºया सामाजिक संस्थाशी सतत आहोत. त्यामुळे हे सर्व अपेक्षित आहे. यातून इतर रुग्णालयांनाही प्रोत्साहित करण्यात येत आहे.- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता,बा.य.ल. नायर रुग्णालय.

टॅग्स :हॉस्पिटल