'माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर माझे लाईट बिल माझी जबाबदारी'

By महेश गलांडे | Published: November 19, 2020 03:51 PM2020-11-19T15:51:28+5:302020-11-19T15:52:30+5:30

महाविकास आघाडी सरकारने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांची काळजी म्हणून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम राबवली. या मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसादही मिळाला.

'My light bill is my responsibility after the success of my family', kirit somaiya tweet | 'माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर माझे लाईट बिल माझी जबाबदारी'

'माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर माझे लाईट बिल माझी जबाबदारी'

Next
ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांची काळजी म्हणून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम राबवली. या मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसादही मिळाला

मुंबई - राज्यातील वाढीव वीजबिलांबाबत ठाकरे सरकारने कोणताही दिलासा नाही, इतकचं नाही तर वीज वापरली असेल तर बिल भरावेच लागेल, कुठलीही माफी आणि सवलत देणार नाही असं स्पष्टपणे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जनतेला सांगितले. त्यामुळे लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात असणाऱ्या वीज ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष पेटला आहे. भाजपासह मनसेनंही महाविकास आघाडी सरकारवरला इशारा दिला आहे. तर, भाजपा नेते विज बिलावरुन सरकारला लक्ष्य करत आहेत. 

महाविकास आघाडी सरकारने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांची काळजी म्हणून माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम राबवली. या मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसादही मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही या मोहिमेचं कौतुक करत, या मोहिमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात महाराष्ट्राल मोठं यश आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, कोरोनाचा मृत्यूदर आणि वाढती संख्या आटोक्यात आणली गेली, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. राज्य सराकरच्या या मोहिमेला अनुसरुनच विज बिलासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. 


 
किरीट सोमैय्या यांनी एका पत्रकाराचा हवाला देत ट्विट केलंय. "माझे कुटुंब माझी जवाबदारी" च्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना. "माझे लाईट बिल माझी जवाबदारी", असे म्हणत किरीट सोमैय्या यांनी महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडवली आहे. दरम्यान, राज्यातील वाढीव वीजबिलांबाबत ठाकरे सरकारने कोणताही दिलासा नाही, इतकचं नाही तर वीज वापरली असेल तर बिल भरावेच लागेल, कुठलीही माफी आणि सवलत देणार नाही असं स्पष्टपणे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जनतेला सांगितले. त्यामुळे लॉकडाऊन काळातील विज बिलात सवलत मिळेल, या आशेवर असलेल्या आणि आर्थिक संकटात असणाऱ्या वीज ग्राहकांना मोठा शॉक बसला आहे. 

राज ठाकरेंची बैठक 

ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे, परंतु तत्पूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन सरकारला इशाराच दिला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते" अशा शब्दात येणाऱ्या काळात मनसे वीजबिलाच्या माफीसाठी रस्त्यावर उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

Web Title: 'My light bill is my responsibility after the success of my family', kirit somaiya tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.