"माझे वडील मराठी नाहीत, मीही नाही... तुमचं विधान चुकीचं"; संजय राऊतांच्या ट्विटवर सुमीत राघवनचा 'रिप्लाय'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 09:28 PM2020-09-04T21:28:52+5:302020-09-04T21:30:21+5:30

संजय राऊत यांच्या या विधानावर अभिनेता सुमीत राघवन यानं त्याचं मत व्यक्त केलं.

"My father is not Marathi, neither am I ... Your statement is wrong"; Sumit Raghavan's 'reply' to Sanjay Raut's tweet | "माझे वडील मराठी नाहीत, मीही नाही... तुमचं विधान चुकीचं"; संजय राऊतांच्या ट्विटवर सुमीत राघवनचा 'रिप्लाय'

"माझे वडील मराठी नाहीत, मीही नाही... तुमचं विधान चुकीचं"; संजय राऊतांच्या ट्विटवर सुमीत राघवनचा 'रिप्लाय'

अभिनेत्री कंगना राणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने नेते, अभिनेत्यांकडून टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. यातच कंगनाने '9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा', असे आव्हान दिले. त्यावरून  शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी कंगनाला ट्विट केलं. ''मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहणार नाही.'', असे आक्रमक इशाराच त्यांनी दिला.  

संजय राऊत यांच्या या विधानावर अभिनेता सुमीत राघवन यानं त्याचं मत व्यक्त केलं. सुमीतनं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा जुना फोटो पोस्ट करत राऊत यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलंय. त्यानं लिहिलं की, ''सर, माझे वडील मराठी नाहीत, मीही नाही. माझा जन्म इथलाच. मी अनेकांपेक्षा उत्तम मराठी बोलू शकतो. ३० वर्षं मराठी रंगभूमीवर काम करतोय. माझी मुलं मराठी शाळेत शिकली. मी म्हणतो मुंबई ही कोणाच्याच बापाची नाहीए. मी दुष्मन झालो का? अतिशय चुकीचं विधान आहे तुमचं.''  

 

शिवसेनेनं धमकी देणं अयोग्य, कंगनाला 'आरपीआय' संरक्षण देणार; रामदास आठवले

वाघिण मुंबईत येतेय, दम असेल तर अडवून दाखवा; बबिता फोगाटनं दिलं चॅलेंज

महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी राज्यासाठी काय केलं? कंगनाचा तिखट सवाल

Web Title: "My father is not Marathi, neither am I ... Your statement is wrong"; Sumit Raghavan's 'reply' to Sanjay Raut's tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.