Join us  

अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 2:42 AM

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना नेहरूनगरमध्ये उघडकीस आली. गुरुवारी टिळकनगर टर्मिनस यार्डमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.

मुंबई : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना नेहरूनगरमध्ये उघडकीस आली. गुरुवारी टिळकनगर टर्मिनस यार्डमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. अवघ्या १२ तासांत नेहरूनगर पोलिसांनी हत्येचा उलगडा करत आरोपीला बेड्या ठोकल्या. अंकुश प्रल्हाद पांढरे (३०) असे आरोपीचे नाव आहे.पत्राचाळ परिसरात जगन्नाथ शिंगाडे (२२) हा तरुण कुटुंबीयांसोबत राहायचा. बुधवारी तो बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याची नोंद करत तपास सुरू केला. त्यादरम्यान टिळक टर्मिनस यार्डमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तो मृतदेह शिंगाडेचा असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान शिंगाडे अखेरचा पांढरेसोबत जाताना दिसला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.