स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेतील ११ ‘मुन्नाभाई’ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 03:04 AM2019-08-08T03:04:20+5:302019-08-08T03:04:28+5:30

हरियाणातील विद्यार्थी; पवई पोलिसांची कामगिरी

In the 'Munnabhai' detention in the staff selection commission examination | स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेतील ११ ‘मुन्नाभाई’ अटकेत

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेतील ११ ‘मुन्नाभाई’ अटकेत

Next

मुंबई : मुन्नाभाई चित्रपटाप्रमाणे ब्लुटूथ कॉलर डिव्हाईज व कानात मायक्रोफोन घालून स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परिक्षेत कॉपी करण्याच्या तयारीत असलेल्या ११ विद्यार्थ्यांना मंगळवारी पवई पोलिसांनी अटक केली.

प्रदीपकुमार ओमप्रकाश (२६), राजू रामनिवास (२०), अमन हरिकेश (२३), दिनेश दलबीर (२५), मोहीत बिजेंदर (२०), कुशकुमार पुलकुमार (२४), नवीन सुभाषचंद्र (१९), सुमीत कुलदीप (२१), राकेश ओमप्रकाश (२३), सौरभ सुभाष (२१), नवीन रणधीर सिंग (२३) अशी अटक विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी हरियाणातील हिंद व हिसार जिल्ह्यातील आहेत. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पवई येथील ऑरम आयटी पार्क येथील ऑनलाइन एक्झाम सेंटरमध्ये मंगळवारी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेसाठी पहिल्या सत्रात १८७० विद्यार्थी आले होते. केतन चव्हाण हे पर्यवेक्षणाचे काम करत होते. त्याचदरम्यान परीक्षा केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर २५० विद्यार्थ्यांची मेटल डिटेक्टरच्या मदतीने तपासणी सुरू करण्ययात आली. त्यावेळी ११ विद्यार्थ्यांकडे ब्लुटूथ, कॉलर डिव्हाईज व मायक्रोफोन सापडले.

कॉपीसाठी त्यांनी याचा वापर केला होता. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठ व बोर्डमधील परिक्षांमधील गैरवर्तन प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हरियाणातील एक जण अकराही जणांना एकत्रित प्रश्नांची उत्तरे सांगणार होता, अशी माहिती समोर येत आहे. संबंधित आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. यात पैशांचा व्यवहार झाला होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे.

Web Title: In the 'Munnabhai' detention in the staff selection commission examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा