Join us  

अनधिकृत बांधकामापुढे महापालिका हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 1:29 AM

डोंगरी येथील दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई : डोंगरी येथील दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्य म्हणजे ही इमारत अधिकृत की अनधिकृत, यावरून वाद रंगला आहे. महापालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे धोकादायक इमारती आणि अनधिकृत इमारतींवरील कारवाई रेंगाळली आहे. बी विभाग कार्यालयात गुंडांचे राज्य असून, दुमजली इमारतींवर सात-आठ अनधिकृत मजले राजरोस चढत असल्याचा आरोप सर्वपक्षीय गटनेत्यांनी केला.डोंगरीप्रमाणे मुंबईत बऱ्याच ठिकाणी इमारतींवर अनधिकृत मजले वाढविण्यात आले आहेत. या इमारतींवर वेळीच कारवाई होत नसल्याने विकासकांची हिंमत वाढत चालली आहे.अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारीच त्याकडे डोळेझाक करतात. अधिकाऱ्यांचे संगनमत, माफिया राज यापुढे महापालिका हतबल असल्याची नाराजी सर्वपक्षीय गटनेत्यांनी व्यक्त केली, तर राजकीय दबावामुळे अनेक वेळा कारवाई करणे अधिकाºयांना शक्य होत नाही, असे पालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले.।दक्षिण मुंबईतील इमारती चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये असल्याने आपत्ती काळात मदत कार्य पोहोचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे खबरदारी म्हणून बी, सी, डी आणि ई म्हणजेच मोहम्मद अली रोड ते भायखळ्यापर्यंत आॅडिट व्हावे. बी विभागात पालिका अधिकारी आणि बेकायदा बांधकाम करणाºयांचे रॅकेट आहे. अनधिकृत बांधकामांना अभय देणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई व्हावी.- यशवंत जाधव (स्थायी समिती अध्यक्ष).।बी विभागात मोठे रॅकेटडोंगरी येथील दहा-बारा इमारतींवर अनधिकृत मजले चढले आहेत. दोन मजल्यांच्या इमारती दहा मजल्यांच्या झाल्या आहेत. या दुर्घटनेनंतर खरंतर बी विभागातील काही अधिकाºयांचे निलंबन होणे अपेक्षित होते, तरीही प्रशासन सुस्त आहे.- रईस शेख (गटनेते, समाजवादी पक्ष)अनधिकृत मजल्यांची माहिती द्याडोंगरीमध्ये मंगळवारी कोसळलेली इमारत धोकादायक असल्याचे महापालिकेला आधी कळले होते का? जर कळले होते, तर त्यावर कारवाई का झाली नाही? किती इमारतींवर पुनर्विकासाच्या नावाखाली अनधिकृत मजले चढविण्यात आले? त्यावर काय कारवाई झाली? याची माहिती उघड करावी.- राखी जाधव (गटनेत्या, राष्ट्रवादी पक्ष).