Join us  

पालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या ठेवी आता पोस्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 2:31 AM

सात कोटी ६६ लाख गुंतविणार; प्रोत्साहन भत्ता बँकेत न ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय

मुंबई : महापालिका शाळांमध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थिनींना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता बँकेत न ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याऐवजी आता ही रक्कम टपाल खात्यांमध्ये ठेवण्यात येणार आहे. अशी सात कोटी ६६ लाखांची रक्कम पालिका पहिल्यांदाच भारतीय टपाल खात्यात गुंतविणार आहे.

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींची पटसंख्या वाढविणे, ती कायम राखणे आणि त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढण्यासाठी महापालिकेने प्रत्येक विद्यार्थिनीसाठी सन २००७ मध्ये प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रतिदिन एक रुपया देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सन २००९-१० पर्यंत ५०० ते २,५०० रुपयांची रक्कम या मुलींच्या बँक खात्यांत जमा करण्यात आली आहे. पहिलीपासून ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना २,५०० रुपये दिले जायचे, परंतु ही रक्कम आता एक हजार रुपये ते पाच हजार रुपये एवढी करण्यात आली आहे. या आधी ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत गुंतविली जात होती. २०१८-१९ मध्ये पालिकेने बँकांकडून स्वारस्य मागविले. त्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेसह तीन बँकांनी प्रतिसाद दिला. यापैकी पंजाब नॅशनल बँकेची निवड करण्यात आली होती. मात्र, आता पालिका प्रशासनाने आपला निर्णय बदलला असून, पालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या ठेवी पोस्टात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी केली टपाल खात्याची निवडच्महापालिकेच्या इयत्ता आठवीत शिकणाºया विद्यार्थिनींची संख्या १४ हजार ८२ आहे, तर माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींची संख्या २,३९९ एवढी आहे. एकूण १६ हजार ४८१ विद्यार्थिनी असून, त्यांच्यासाठी सात कोटी ६६ लाख ५० हजार रुपये एवढी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देय आहे. ही सर्व रक्कम बँकेऐवजी पोस्टात भरली जाणार आहे. बँकेऐवजी पोस्टात रक्कम भरण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.च्बँकेत पैसे भरायचे झाल्यास एखाद्या विद्यार्थिनीकडे पुराव्यासाठी आधार कार्ड नसेल, तर बँकेत त्या विद्यार्थिनीचे खाते उघडण्यात अडचणी येत होत्या. या ‘केवायसी’साठी पालकांना आणि विद्यार्थिनींना प्रत्येक वेळी पुरावे सादर करावे लागत होते. बँकेसोबत काम करताना मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनाच ही कामे करावी लागत होती. त्यामुळे शाळांना अडचणीचा सामना करावा लागत होता.च्भारत सरकारचा उपक्रम असल्याने, भारतीय टपाल खात्याची विश्वासार्हता अधिक आहे. संपूर्ण भारतात त्यांच्या शाखा आहेत. त्यामुळे कुठूनही पैसे काढता येतात, तसेच संबंधित विद्यार्थिनीचे आधार कार्ड कोणत्याही शुल्काशिवाय पोस्ट खाते काढून देत असल्याने, महापालिकेने पंजाब नॅशनल बँकेऐवजी पोस्टात मुदत ठेवी रक्कम भरण्याची तयारी दर्शविली आहे.

टॅग्स :मुंबई