Join us  

मुंबईचा पारा ३६ अंशावर, आॅक्टोबर हिटने मुंबईकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:50 AM

मुंबई : मान्सूनने माघार घेतल्यानंतर मुंबईच्या कमाल तापमानाचा कडाका आता वाढतच आहे. आॅक्टोबर हिटने मुंबई हैराण झाली असतानाच बुधवारी मुंबईच्या कमाल तापमानाने थेट ३६ अंशावर मजल मारली आहे.

मुंबई : मान्सूनने माघार घेतल्यानंतर मुंबईच्या कमाल तापमानाचा कडाका आता वाढतच आहे. आॅक्टोबर हिटने मुंबई हैराण झाली असतानाच बुधवारी मुंबईच्या कमाल तापमानाने थेट ३६ अंशावर मजल मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे या हंगामातील हे आतापर्यंत नोंदविण्यात आलेले सर्वाधिक तापमान आहे. वाढत्या तापमानासह वाढता उकाडा आणि वाढते ऊन मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक ठरत आहे. उत्तरोत्तर यात वाढच नोंदविण्यात येणार आहे.बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले असतानाच दिवसभर पडलेले ऊन आणि वाढती आर्द्रता या दोन घटकांमुळे मुंबईकरांना घाम फोडला. मागील काही दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानात कमालीचे चढउतार नोंदविण्यात येत आहेत. तीन दिवसांपूर्वी मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश नोंदविण्यात आले. यात दोन अंशाची घसरण झाली आणि कमाल तापमान ३२ अंश नोंदविण्यात आले. पुन्हा यात वाढ झाली आणि कमाल तापमानाने पुन्हा ३४ अंशावर मजल मारली. बुधवारी तर कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले.