Join us

मुंबईचा पारा १७ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३२.२ तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३२.२ तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ७.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे उत्तर-मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात चक्रिय चक्रवात तयार झाले आहे. तर कमी दाबाचा पट्टा उत्तर केरळपासून मध्य महाराष्ट्र व लगतच्या चक्रिय चक्रवातापर्यंत आहे. परिणामी पुढील काही दिवसात हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मराठवाड्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. तर दिनांक १ ते ४ फेब्रुवारीदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.