Join us  

मुंबईकरांना उन्हाचा ‘ताप’, कमाल तापमान ३४ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 5:01 AM

मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमान ३० अंशांहून ३४ अंशांवर पोहोचले असून, वाहते कोरडे वारे वाढत्या उन्हासह कमाल तापमानात भर घालत आहेत. परिणामी मुंबईकरांची दुपार ‘कडक’ जात आहे. राज्यभरातील शहरांच्या किमानतापमानातही वाढ नोंदविण्यात येत असून, वाढतेकमाल तापमान मुंबईमधील ‘ताप’दायक वातावरणात भर घालत आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. राज्यात सर्वात कमी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे १४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर २४ ते २७ फेब्रुवारीदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. शनिवारसह रविवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २० अंशांच्या आसपास राहील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.