Join us  

मुंबईचा ६0 टक्के बाजार ठप्प पडणार; ‘बीजीटीए’, माथाडी कामगारांना भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 2:41 AM

मुंबई : अवजड वाहनांवर मुंबईत दिवसभर प्रवेशबंदी लादण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. परिणामी, वाहतूकदारांना १७ तासांचे मालवाहतुकीचे काम अवघ्या ५ तासांत करावे लागेल. त्यामुळे मुंबईतील ६0 टक्क्यांहून अधिक किरकोळ बाजार ठप्प पडण्याची भीती व्यक्त करत बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन (बीजीटीए) आणि माथाडी कामगार संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.

ठळक मुद्देअवजड वाहनांवर दिवसभर प्रवेशबंदी  

 चेतन ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अवजड वाहनांवर मुंबईत दिवसभर प्रवेशबंदी लादण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. परिणामी, वाहतूकदारांना १७ तासांचे मालवाहतुकीचे काम अवघ्या ५ तासांत करावे लागेल. त्यामुळे मुंबईतील ६0 टक्क्यांहून अधिक किरकोळ बाजार ठप्प पडण्याची भीती व्यक्त करत बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन (बीजीटीए) आणि माथाडी कामगार संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.बीजीटीए संघटनेचे सरचिटणीस अनिल विजन म्हणाले की, सप्टेंबर २0१७ साली वाहतूक प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला. संघटनेने आक्षेप घेतल्याने त्यांनी निर्णय मागे घेतला. पण अचानक २३ जानेवारी २0१८ रोजी दिवसभर अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी केली. याची अंमलबजावणी २ फेब्रुवारीपासून सुरू झाली, निर्णयाची प्रत संघटनेला ५ फेब्रुवारीला दिली. वस्तुस्थिती पाहून निर्णय घेण्याची मागणी संघटनेने केली आहे. वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांच्याशीही चर्चा केली आहे. माथाडी कामगारांचे नेते आमदार नरेंद्र पाटील म्हणाले, शहरातील ३ ते ४ हजार कामगारांची उपजीविका मालाची चढउतार करण्यावर होते. निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी  दिला.

नुकसान कसे भरणार?दक्षिण मुंबईतून प्रामुख्याने महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात मालाची आयात व निर्यात होते. या ठिकाणी असलेल्या मशिद बंदर, चिंच बंदर, वाडी बंदर, दाना बंदर आणि अन्य बाजारपेठांत सुमारे ७00 ते ८00 गोदामे आहेत. मुंबईत कपडा, हार्डवेअर सामान व मशिनचे सुटे पार्ट, कटलरी, ऑटो पार्ट, गारमेंट, इलेक्ट्रिकल सामानांची खरेदी-विक्री करणारे विक्रेते आहेत. या सर्व मालाच्या वाहतुकीसाठी दिवसाला सुमारे २00 ते २५0 ट्रक मुंबईत ये-जा करतात. त्यामुळे या व्यवसायावर निर्णयाचा परिणाम झाल्यास नुकसान कसे भरणार, असा सवाल बीजीटीए संघटनेने केला आहे.

टॅग्स :मुंबईबाजार