Join us

मुंबईकरांनो, पावसाळ्यात डोळे सांभाळा

By admin | Updated: July 13, 2015 02:39 IST

पावसाळा सुरू झाल्यावर डासांपासून, पाण्यापासून होणाऱ्या साथीच्या आजारांबरोबर जीवाणूंच्या संसर्गामुळे आजारांचा फैलाव होतो. जुलै महिन्यापासून

मुंबई: पावसाळा सुरू झाल्यावर डासांपासून, पाण्यापासून होणाऱ्या साथीच्या आजारांबरोबर जीवाणूंच्या संसर्गामुळे आजारांचा फैलाव होतो. जुलै महिन्यापासून मुंबईत डोळ््यांची साथ आल्याचेही समोर आले आहे. डोळ््यांची स्वच्छता राखा, डोळ््यांना हात लावू नका आणि डोळे येणे टाळा, असा सल्ला नेत्रचिकित्सक देत आहेत. पावसाळा सुरू झाला की, साथीच्या आजारांच्या प्रमाणात वाढ होते. यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, कावीळ हे आजार प्रामुख्याने दिसून येतात. त्वरित उपचार न केल्यास या आजारांमुळे लोकांना जीव गमवावा लागतो. पावसाळ््यात जीवाणूंमुळे होणारा आजार म्हणजे डोळे येणे. जीवाणूच्या संसर्गामुळे डोळे दुखतात, लाल होतात. डोळे बरे होण्यासाठी ५ ते ७ दिवसांचा कालावधी लागतो. अनेकदा डोळे लाल होणे, डोळ््यात काहीतरी खुपत असल्यासारखे वाटणे, याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा डोळ््यात गुलाबपाणी घालणे, डोळ््यावर थंड दुधाच्या पट्ट्या ठेवणे, डोळे स्वच्छ पाण्याने धुणे असे घरगुती उपाय केले जातात. तर, अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधांच्या दुकानातून ड्रॉप्स आणून डोळ््यात घालतात. काहीवेळा डोळे दुखायचे थांबतात, लालपणा कमी होतो. पण, असे करणे योग्य नाही. तात्पुरते बरे वाटले तरीही पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो. संसर्ग बुबुळापर्यंत गेल्यास अंधत्व येण्याचा धोका असतो. डोळा अतिशय नाजूक असल्यामुळे डोळ््याला त्रास झाल्यास नेत्रचिकित्सक तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.