Join us  

मुंबईकरांना थंडीची चाहूल; तापमानातील चढउतार कायम, पारा ३६ अंशाहून ३३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:53 AM

आॅक्टोबर हिटने दिलेल्या तडाख्यानंतर आता मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचे चढउतार नोंदविण्यात येत आहेत. कमाल तापमानाचा पारा ३६ अंशाहून ३३ अंशावर घसरला आहे. किमान तापमान २६ ते २४ अंशाहून २१ अंशावर घसरले आहे.

मुंबई : आॅक्टोबर हिटने दिलेल्या तडाख्यानंतर आता मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचे चढउतार नोंदविण्यात येत आहेत. कमाल तापमानाचा पारा ३६ अंशाहून ३३ अंशावर घसरला आहे. किमान तापमान २६ ते २४ अंशाहून २१ अंशावर घसरले आहे. किमान तापमानात घसरण नोंदविण्यात येत असली तरी कमाल तापमानात चढउतार नोंदविण्यात येत असून, कमाल तापमान ३५, ३६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. किमान तापमानातील घसरणीमुळे मुंबईकरांना थंडीची चाहूल लागल्याचे चित्र आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.५ व ६ नोव्हेंबर रोजी मुंबई व आसपासच्या परिसरातील आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येमुंबई २१, रत्नागिरी १८.७, भिरा १७, पुणे १२.५, अहमदनगर १२.८, जळगाव १५.२, कोल्हापूर १७.५, महाबळेश्वर १४.६

टॅग्स :मुंबई