Join us  

मुंबईला मिळणार ४० इलेक्ट्रिक बसेस, मुख्यमंत्री फेलोशिपमधील तरुणांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 1:55 AM

समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन ते तीन सुशिक्षित तरुण मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राममध्ये काही महिन्यांपूर्वी सहभागी झाले आणि आता मुंबईसाठी ४० इलेक्ट्रिक बसेस मिळवून देण्यात आपण महत्त्वाची भूमिका पार पाडू शकलो, याचे समाधान त्यांच्या चेह-यावर आहे.

मुंबई : समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन ते तीन सुशिक्षित तरुण मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राममध्ये काही महिन्यांपूर्वी सहभागी झाले आणि आता मुंबईसाठी ४० इलेक्ट्रिक बसेस मिळवून देण्यात आपण महत्त्वाची भूमिका पार पाडू शकलो, याचे समाधान त्यांच्या चेह-यावर आहे.अली मूर्तजा कोठावाला, अरमान जेना आणि श्याम दात्ये हे ते पंचविशीतील तरुण. मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राममध्ये तरुण-तरुणींना सहभागी करून घेतले जाते आणि त्यांना शासकीय योजना, विशिष्ट कामे/उपक्रमांचा फॉलोअप घेणे, नवनवीन संकल्पना सुचविणे आदी कामे सोपविली जातात.मुंबईकरांच्या सदैव सेवेत असलेल्या बेस्ट बससेवेच्या माध्यमातून नवनवीन काही करता येईल का, याची जबाबदारी या तीन तरुणांवर सोपविण्यात आली होती. त्यातच केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक बसेससाठी अनुदानाची योजना नोव्हेंबर २०१७ मध्ये आणली. या तिघांनी ही योजना बेस्ट प्रशासनाला सुचविली.बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी ती उचलून धरली आणि मुंबईला ४० नव्या कोºया इलेक्ट्रिक बसेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बसेस ३० ते ३५ आसनी असतील आणि प्रवाशांच्या सेवेत ४ महिन्यांत दाखल होतील.बेस्टच्या अधिकाºयांबरोबर या तिघांनी सातत्याने बैठका घेतल्या. बसच्या किमतीच्या ६० टक्के रक्कम किंवा एक कोटी रुपये यात जे कमी असेल तेवढी रक्कम अनुदान म्हणून प्रत्येक बसमागे देण्याची ही योजना आहे. त्यासाठी २१ राज्यांतील ४४ शहरांनी अर्ज केले. त्यात मुंबई (बेस्ट), नवी मुंबई आणि पुण्याचा समावेश होता. अंतिमत: ११ राज्यांमधील ११ शहरांची निवड झाली.त्यात मुंबईला व पर्यायाने बेस्टला संधी मिळाली. ४० बसेससाठी ३६ कोटी रुपयांचे अनुदान बेस्टसाठी मंजूर झाले आहे. बेस्टचे व्हिक्टर नगावकर, याच विभागातील जी. पी. पवार, चंद्रकांत बिराजदार, रणजित सिंग यांचे मोठे सहकार्य लाभल्याची कृतज्ञता तिन्ही तरुणांनी व्यक्त केली.३६ कोटींचे अनुदान- ४० बसेससाठी ३६ कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे़ प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बसेस हा उत्तम पर्याय मानला जातो़ आता बेस्टने नवीन बसेस खरेदी करण्यासाठी निविदाही काढली आहे़- या बसेस ३५ आसनी असून त्या चार महिन्यांत दाखल होती़ या बसेससाठी ४४ शहरांनी अर्ज केला होता़ मुंबई, नवी मुंबई व पुण्याचा यात समावेश होता़ मुंबईला संधी मिळाली़

टॅग्स :मुंबई