Join us  

मुंबई तुंबली, पण पालिकेने नाही पाहिली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:42 AM

शहर आणि उपनगरात सोमवारी पडलेल्या पावसाने चक्का जाम केला असतानाच, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वच यंत्रणा सतर्क, सज्ज आणि प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

मुंबई : शहर आणि उपनगरात सोमवारी पडलेल्या पावसाने चक्का जाम केला असतानाच, आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वच यंत्रणा सतर्क, सज्ज आणि प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी केलेल्या कामामुळे मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नाही. महानगरपालिकेने १२० ठिकाणी पाण्याचा निचरा जलदगतीने होण्याकरिता केलेल्या कामांमुळे पाणी भरण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत, असे महापालिकेने म्हटले आहे.कुलाबा वेधशाळेनुसार २४ जून रोजीच्या सकाळी ८ ते २५ जूनच्या सकाळी ८ या कालावधीत सांताक्रुझ येथे २३१.४ मिमी, तर कुलाबा येथे ९९ मिमी पावसाची नोंद झाली. महानगरपालिकेने बसविलेल्या ६० स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांपैकी उपरोक्त वेळेदरम्यान शहरात एफ/उत्तर येथे १८२ मिमी, वडाळा १७३ मिमी, धारावी १६८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. पश्चिम व पूर्व उपनगरात बोरीवली २३७ मिमी, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह २२९, कांदिवली वर्कशॉप २२८, दहिसर २१५, भांडुप १८२, मुलुंड १७८, गवाणपाडा १७६, एल विभाग १६७ पावसाची नोंद झाली.सायन रोड नंबर २४, महेश्वरी उद्यान, समाज मंदिर हॉल, प्रतीक्षानगर, चेंबूर फाटक, मोरारजीनगर, फिल्टर पाडा,मिलन सबवे, साईनाथ सबवे, मालाड, नॅशनल कॉलेज, एस. व्ही, रोड, सिद्धार्थ हॉस्पिटल, गोरेगाव या ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारींवर त्वरित कार्यवाही करून पाण्याचा निचरा करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी पश्चिम उपनगरातील मिलन सबवे, इर्ला नाला व परिसराची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी टिळकनगर नाला, शिवसृष्टी नाला, पोस्टल कॉलनी, मानखुर्द स्थानक, पांजरपोळ जंक्शन, शिवाजीनगर या परिसराची पहाणी केली.अतिरिक्त आयुक्त ए. एल. जºहाड यांनी शहर विभागातील परिसराची पाहणी केली.६३३ अधिकारी, ४ हजार ६७० कर्मचारी तैनात२४ जूनपासून आत्तापर्यंत पालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित होती.विभागीय सहायक आयुक्तांसह सुमारे ६३३ अधिकारी व ४ हजार ६७० कर्मचारी या कामाकरिता तैनात करण्यात आले होते.मुंबई शहर व उपनगरात १८३ ठिकाणी उदंचन संच सुरू करण्यात आले.मुख्य ७ उदंचन केंद्रातील २२ इतके संच वापरण्यात आले.खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्या, शहर आपत्ती प्रतिसाद पथकाच्या सर्व तुकड्या, नौदल, तटरक्षक दल यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.महानगरपालिकेच्या १४२ शाळा आवश्यकता भासल्यास तात्पुरत्या निवाऱ्याकरिता उपलब्ध करून ठेवण्यात आल्या होत्या.शहरात ३ पूर्व उपनगरात १ व पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ७ ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

टॅग्स :मुंबईचा पाऊस