Join us  

रात्रीच्या फुकट्या प्रवाशांवर ‘बॅटमॅन’ चा डोळा  

By सचिन लुंगसे | Published: March 14, 2024 7:35 PM

Mumbai Suburban Railway: पश्चिम रेल्वे मार्गावर रात्री फुकट प्रवास करणा-या प्रवाशांवर आता ‘बॅटमॅन’ नावाचे विशेष पथक कारवाई करत आहे. रात्री-अपरात्री फर्स्ट क्लासच्या डब्यासह जनरल डब्यातून प्रवास फुकट प्रवास करणा-या प्रवाशांना रोखणे आणि त्यांना दंड करणे, हे काम पथकाकडून केले जात आहे.

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर रात्री फुकट प्रवास करणा-या प्रवाशांवर आता ‘बॅटमॅन’ नावाचे विशेष पथक कारवाई करत आहे. रात्री-अपरात्री फर्स्ट क्लासच्या डब्यासह जनरल डब्यातून प्रवास फुकट प्रवास करणा-या प्रवाशांना रोखणे आणि त्यांना दंड करणे, हे काम पथकाकडून केले जात आहे. त्यानुसार, आतापर्यंत दोन रात्रीदरम्यान कारवाई करण्यात आली आहे. २ हजार ३०० फुकट प्रवास करणा-या प्रवाशांना पकडण्यात आले आहे. याद्वारे ६ लाख ३० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.- विशेष म्हणजे रात्री फुकट प्रवास करणा-या प्रवाशांना अद्दल घडविण्यासाठी ‘बॅटमन’ची संकल्पना एका रेल्वे प्रवाशाने रेल्वेला सुचविली होती. - ‘बॅटमॅन’मधील सदस्यांना रात्री कसे काम करावे ? याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.- तिकिट तपासतानाच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे.-नियमित प्रवाशांनी रेल्वेच्या या नव्या संकल्पनेचे कौतुक केले असून, याद्वारे फुकटया प्रवाशांना जबाबदारीची जाणीव करून दिली जात आहे.- उपनगरीय लोकलमधून प्रवास करणा-या प्रवाशांचा प्रवास चांगला व्हावा म्हणून ही कारवाई केली जात आहे.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेपश्चिम रेल्वेमुंबई