Join us  

मुंबईत १ हजार कोटींचा बाजार उभारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 11:59 PM

मुंबईत प्रथमच सुरू झालेल्या शेतकरी आठवडी बाजाराला रविवारी ७५ आठवडे पूर्ण झाले आहेत.

चेतन ननावरेमुंबई : मुंबईत प्रथमच सुरू झालेल्या शेतकरी आठवडी बाजाराला रविवारी ७५ आठवडे पूर्ण झाले आहेत. ‘मी मुंबई अभियान’ संस्थेने सुरू केलेल्या या बाजारांच्या माध्यमातून मुंबईत एक हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय उभारण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी केली. लालबाग येथील शेतकरी आठवडी बाजारात ते ‘लोकमत’शी बोलत होते.लाड म्हणाले की, सध्या मुंबई शहर आणि उपनगरात संस्थेतर्फे शेतकऱ्यांचे आठवडी बाजार भरत आहेत. प्रत्येक आठवडी बाजारात सरासरी शेतकºयांचे २८ ते ३५ बचत गट काम करत आहेत. प्रत्येक बचत गटात १० ते १५ शेतकरी व त्यांची मुले काम करतात. त्यामुळे या बाजाराच्या माध्यमातून सुमारे ५०० ते ७०० शेतकरी कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आठवडी बाजारामुळे दलालांची साखळी मोडली असून शेतकºयांना हमीभाव आणि ग्राहकांना स्वस्त आणि ताजा भाजीपाला व फळे मिळत आहेत.मुंबईत हाच उपक्रम व्यापक स्वरूपात राबवून एक हजार कोटींचा व्यवसाय उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. त्यात प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणी सहा बाजार लावण्याची योजना आहे. म्हणजेच एकाचवेळी मुंबईत आठवड्याला ३६ आठवडी बाजार भरतील. सकाळी शेतातील भाजीपाला काढून दुपारी तो मुंबईकरांसाठी आणला जाईल. अशा प्रकारे मुंबईत सुमारे १ हजार कोटींची उलाढाल करणारा हा व्यवसाय उभा होईल, अशी माहिती लाड यांनी दिली.या आठवडी बाजारातून शेतकरी व महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हे फेरीवाले नसून शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र आणि सातबारा या ठिकाणी पाहायला मिळतो. राज्याला आर्थिकदृष्ट्या विकासाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी ही कल्पना भविष्यात वाढवण्याचा मानस आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.शेतकºयांना वीज, तंबू, टेबल, ट्रे अशी साधनसामग्री पुरवण्याचे काम मी मुंबई अभियान संस्था करत आहे. शेतकरी स्वत: स्टॉल लावण्याआधी त्याखाली ताडपत्री अंथरतात व जागा सोडताना साफसफाई करून जातात. त्यामुळे बाजाराच्या ठिकाणी कचरा होत नाही. रायगड, सांगली, सातारा, पुणे, नाशिकच्या शेतकºयांना एकत्रित आणत व्यासपीठ निर्माण करण्याचे काम संस्थेने केले. त्यामुळे सामाजिक सुरक्षा देत हा बाजार उभा केल्याचे संस्थेने स्पष्ट केले.