Join us  

मुंबई पालिकेला तीन राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 7:12 AM

युनेस्को व केंद्र सरकारच्या सहकार्याने वॉटर डायजेस्टद्वारे दिल्लीत आयोजित सोहळ्यात, मुंबई पालिकेला तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी नुकतेच गौरविण्यात आले.

मुंबई - युनेस्को व केंद्र सरकारच्या सहकार्याने वॉटर डायजेस्टद्वारे दिल्लीत आयोजित सोहळ्यात, मुंबई पालिकेला तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी नुकतेच गौरविण्यात आले. बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनियर प्रोजेक्ट, वॉटर री-यूज प्रोजेक्ट आॅफ द ईअर आणि बेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्ट या तीन गटांमध्ये महापालिकेला पुरस्कार प्राप्त झाले आहेत.नवी दिल्लीत आयोजित एका सोहळ्याच्या दरम्यान केंद्रीय जलसंसाधनमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे यांनी ते स्वीकारले. पाणीपुरवठा क्षेत्रात महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ‘वॉटर डायजेस्ट’ या पुरस्कार सोहळ्यास केंद्र सरकार व विविध राज्यांतील सरकारांमधील वरिष्ठ अधिकाºयांसह पाणीपुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनियर प्रोजेक्ट या गटात सर्वोत्कृष्ट कार्याचा पुरस्कार महापालिकेच्या गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या जलबोगद्यासाठी देण्यात आला आहे. भिवंडी तालुक्यातील गुंदवलीपासून सुरू होणारा हा जलबोगदा कापूरबावडीमार्गे भांडुप संकुलापर्यंत पाण्याचे वहन करण्यासाठी बांधण्यात आला. १५.१० किमी लांबीचा, ६.२५ मीटर व्यासाचा हा जलबोगदा जमिनीखाली १२० मीटरवर असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सहा वर्षांत बांधण्यात आला आहे.दुसरा पुरस्कार हा ‘वॉटर री-यूज प्रोजेक्ट आॅफ द ईअर’ या गटातील असून, हा ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथे महापालिकेने उभारलेल्या पाणी पुनर्वापर प्रकल्पासाठी देण्यात आला आहे. भातसा धरणातून मुंबईला दररोज २२० कोटी लीटर पाण्याचा पुरवठा होतो. या पाण्यावर पांजरापूर येथील जल प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाते. या प्रकियेदरम्यान दररोज साधारणपणे ४.५ ते ६ कोटी लीटर एवढे पाणी बाहेर टाकले जात असे. याच पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करून ते पाणी परत वापरण्यायोग्य करण्यासाठी प्रकल्प उभारल्याने, या वाया जाणाºया पाण्याचाही वापर करणे शक्य झाले आहे.तिसरा पुरस्कार हा ‘बेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्ट’ या गटात भांडुप येथील ९० कोटी लीटर क्षमतेच्या जलप्रक्रिया केंद्राला देण्यात आला. या जलप्रक्रिया केंद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जलशुद्धीकरण करून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई