Join us  

मुंबई कमालीची गारठली, किमान तापमान १४ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 5:32 AM

मुंबईच्या किमान तापमानात उत्तरोत्तर घटच नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेत अनुक्रमे १४.१, १८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबई - मुंबईच्या किमान तापमानात उत्तरोत्तर घटच नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेत अनुक्रमे १४.१, १८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. आजचे १४.१ हे किमान तापमान चालू मोसमातील आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान आहे. सोमवारी हेच किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे गारवा वाढत असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.मुंबई शहर आणि उपनगरातही मागील आठवड्याभरापासून किमान तापमानात उत्तरोत्तर घट नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे गारवा वाढला आहे.आजही हुडहुडीं२ ते ६ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. बुधवारसह गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १४ ते १६ अंशांदरम्यान राहील. त्यामुळे मुंबईकरांना आणखी २ दिवस हुडहुडीचा अनुभव घेता येणार आहे. दरम्यान, आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

टॅग्स :मुंबई