Join us  

तुंबलेल्या वाहिन्या घेणार मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 4:52 AM

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या वाकोला आणि सात इतर प्लँटवर सुपरव्हायजरी कंट्रोल अ‍ॅण्ड डेटा अ‍ॅक्वीझीशन सिस्टीम बसवली आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या वाकोला आणि सात इतर प्लँटवर सुपरव्हायजरी कंट्रोल अ‍ॅण्ड डेटा अ‍ॅक्वीझीशन सिस्टीम बसवली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तुंबणाऱ्या वाहिन्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे. ही एक अतिशय आधुनिक आणि अद्ययावत संगणकीय यंत्रणा असून यामध्ये वांद्रे क्षेत्रातील १० पम्पिंग स्टेशन्स आणि सर्व ७ सांडपाणी प्रक्रिया सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.यंत्रणेचा मुख्य सर्वर महानगरपालिकेत आहे, तर कुलाबा, वर्सोवा, कलिना, वांद्रे-कुर्ला संकुल, जयभारत, चिंबाई, वांद्रे, माटुंगा, वडाळा, मिठागर भाग यंत्रणेने जोडलेले आहेत.मैला प्रक्रिया प्रकल्पात निचरा होणे (आउट-फ्लो) व अंत:प्रवाह (इन-फ्लो) हे पावसाळ्यात योग्य वेळेत देखरेखीखाली आल्याने मुंबईतील कचरा अनक्लॉग केला जातो. या तंत्रज्ञानाने वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी मदत होईल. मुंबई सीवेज डिस्पोजल प्रोजेक्टचे मुख्य अभियंता अशोक यामगर म्हणाले, ‘वेळोवेळी सूचना मिळाल्याने मोटर्सचा रन टाइम अचूक समजतो. शिवाय आमच्या ७ टर्मिनल्सवर जनरेटर किंवा वाहिन्यांमध्ये काही समस्या असल्यास ती तत्काळ दूर करण्यास मदत होईल. यामुळे वेळेची बचत होईल. पाणी साचले किंवा तुंबल्यास त्याची सूचना सर्वरवरसुद्धा अद्ययावत केली जाते. त्यामुळे पावसाळ्यात तुंबणाºया पाण्याची समस्या सोडवण्यास मदत मिळेल.यंत्रणेचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर कैलास देसाई म्हणाले, १० पम्पिंग स्टेशन्सवर यासंबंधी अद्ययावतीकरण झाल्याने मुंबईकरांना त्याचा फायदा होईल. आणखी इतर काही महानगरपालिकांनी या तंत्रज्ञानाचा अंगीकार केला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका, तिरुची महानगरपालिका, तामिळनाडू महानगरपालिका, दिल्ली जल बोर्ड, गोवा महानगरपालिका आणि कर्नाटक महानगरपालिकेचा समावेश आहे.मैला प्रक्रिया प्रकल्पांना अभियांत्रिकी जटिलता सोडविण्यासाठी विस्तारित सामग्रीची आवश्यकता असते. महत्त्वाच्या पम्पिंग स्टेशन्सचे कार्य हे परवडणाºया स्वयंचलन पर्यायांच्या साथीने सुधारण्यास त्यामुळे मदत होत आहे. शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत या प्रकल्पांना चालना मिळत आहे.

टॅग्स :मुंबईबातम्या