मुंबईत बेघरांसाठी हवीत १२५ निवारागृहे; लाखोंच्या संख्येत बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:23 AM2020-09-07T00:23:19+5:302020-09-07T00:23:26+5:30

पदपथ, उड्डाणपूल, रेल्वे स्थानक हीच निवाऱ्याची जागा

Mumbai needs 125 shelters for the homeless; Millions homeless | मुंबईत बेघरांसाठी हवीत १२५ निवारागृहे; लाखोंच्या संख्येत बेघर

मुंबईत बेघरांसाठी हवीत १२५ निवारागृहे; लाखोंच्या संख्येत बेघर

Next

मुंबई : शासनाच्या सर्व्हेनुसार मुंबईतील बेघरांची संख्या ही ५४ हजार ४१६ इतकी आहे. परंतु अभ्यासानुसार ही संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आहे. हे बेघर पदपथ, ब्रिजच्या खाली, मंदिराजवळ, स्टेशनवर, स्टेशनच्या बाहेर इतरत्र जागा मिळेल तिथे राहतात.

शहरातील १ लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक निवारागृह असणे गरजेचे आहे. परंतु मुंबईतील निवारागृहांची संख्या ही तुलनेने फारच कमी आहे. परिणामी मुंबईत १२५ निवारागृहे आवश्यक असून यावर प्रशासनाने तोडगा काढला पाहिजे. पोटाची खळगी भरत नाही म्हणून कुटुंबची कुटुंबे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबईत स्थलांतरित होत आहेत. मिळालेच कुठे काम तर दिवसभर काबाडकष्ट करून जोडीला ६०० ते ६५० रुपये मिळतात.

न्यायालयाच्या निर्णयानुसार या बेघर लोकांना निवारा मिळावा म्हणून निवारागृह निर्माण केली जावीत, अशी तरतूद आहे. परंतु तुटपुंजी निवारागृहे असल्याने या लोकांना असेच उघड्यावर राहावे लागत आहे. सध्या पावसाळ्यात गळणारी छपरे, अर्ध्या ओल्या झालेल्या चादरी अंगावर ओढताना असमाधानाचा चढलेला पारा त्यांचे जीवन असह्य करून टाकतो आहे.

परिणामी राष्ट्रीय नागरी उपजीविका योजनेच्या अंतर्गत बेघर लोकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला निवारागृहे चालविणे सक्तीचे आहे. २०१४ ते २०१९ महानगरपालिकेच्या अंतर्गत चालविल्या जाणाºया निवारागृहांची आकडेवारी जर आपण पहिली तर ती केवळ ९ इतकी आहे. उर्वरित १० निवारागृहे ही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालविली जात आहेत.

भारतात ०.३१ मिलियन लोक बेघर आहेत
च्०.२३ मिलियन बेघर लोक हे निवारागृहात राहताना दिसून येतात.
च्वास्तविक हा आकडा खूप मोठा आहे.
च्२०१७ अहवालानुसार आतापर्यंत १,३३१ निवारागृहांना अनुमती दिली आहे. त्यातील फक्त ७८९ (५९%) निवारागृहे सध्या सुरू आहेत.
च्एकूण बेघर लोकसंख्येच्या ४.५% लोकसंख्येला निवारा आहे.
च्आकडेवारीनुसार भारतात १६,९३९ निवारागृहांची बेघरांसाठी आवश्यकता आहे.

Web Title: Mumbai needs 125 shelters for the homeless; Millions homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई