Video : आमदार निवास बनलंय निर्वासितांचं घर; 'मनोरा' कधी उभारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:03 PM2019-08-21T14:03:07+5:302019-08-21T14:35:02+5:30

राज्यभरातील आमदारांसाठी मुंबईत हक्काचं घर म्हणून आमदार निवासची सोय करण्यात आली आहे.

Mumbai MLA's residence has become the home of refugees, major crowd of aamdar nivas | Video : आमदार निवास बनलंय निर्वासितांचं घर; 'मनोरा' कधी उभारणार?

Video : आमदार निवास बनलंय निर्वासितांचं घर; 'मनोरा' कधी उभारणार?

googlenewsNext

मुंबई - राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून नेतेमंडळी आपापल्या मतदारसंघात ठाण मांडून बसली आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात आपली कामे उरकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईची वाट धरली आहे. पुढील काही आठवड्यात आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, गेल्या कित्येक महिन्यात जे काम झालं नाही ते आता मंत्रालयात ठाण मांडून करून घ्यावं, या अशा आशेने राज्यभरातून नागरिक राजधानीत येत आहेत. मात्र, गरजवंताला आमदार निवासचा आधार, असं म्हणत आमदार निवास चक्क निर्वासितांचे शिबीर बनल्याचे दिसत आहे.  

राज्यभरातील आमदारांसाठी मुंबईत हक्काचं घर म्हणून आमदार निवासची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन असेल, मंत्रालयातील कामे असतील, पक्षाच्या बैठका असतील किंवा इतर कामकाजावेळी आमदार हे याच आमदार निवासात आश्रयाला असतात. तर, आमदारांचे कार्यकर्तेही येथेच आपले एक-दोन दिवसांचे बस्तान बसवतात. मात्र, मुंबईतील चारपैकी केवळ दोनच आमदार निवास सुरळीत सुरू आहेत. तर उर्वरीत दोन आमदार निवसांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आमदारांसह येथे येणाऱ्या कार्यकर्त्यांचीही चांगलीच गैरसोय होत आहे. 

महाराष्ट्रातल्या कान कोपऱ्यातून सर्वसामान्य जनता आमदार निवासात आश्रयाला येते. मुंबईसारख्या महागड्या शहरात झोपायचं कुठं? हा प्रश्न त्यांना सतावत असतो. त्यावेळी, आमदार निवास हे त्यांच्यासाठी 'सहारा' बनते. तर, सद्यस्थितीत नेत्यांनाही निवडणूक जवळ आल्यामुळे कोणाला नाही म्हणवत नाही. सगळ्यांना निवासासाठी होकार दिलेला असतो. शेवटी या गरजुंना व्हरांड्यात सतरंजी टाकून रात्र काढावी लागते. तर या जनतेला मंत्रालयात दुपारी 2 नंतरच प्रवेश मिळतो. त्यासाठी पास घ्यावा लागतो. हा पास घेण्यासाठीही सकाळी 9 वाजल्यापासून रांगेत उभे राहावे लागते. याशिवाय या महिन्यात सलग तिन्ही शनिवारी सरकारी सुट्ट्या आल्या आहेत. पुढच्या महिन्यातही 2 शनिवार पकडून आणखी 2 सुट्ट्या आहेत. त्यामुळे जनता धास्तावली आहे. आपली फाईल कुठपर्यंत पोहोचली आहे, याचा मागोवा घेण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. मात्र, जनता त्रस्त, नेता मस्त आणि सरकारी अधिकारी सुस्त हे चित्र आमदार निवासात गेल्या अनेक दशकांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे उर्वरीत आमदार निवास कधी सुरू होणार? असा प्रश्नही येथील काही आमदारांकडून विचारला जात आहे. 

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Mumbai MLA's residence has become the home of refugees, major crowd of aamdar nivas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.