Join us

मुंबई मेट्रोच्या वेळेतदेखील वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईची लोकल सोमवारपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार असतानाच आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईची लोकल सोमवारपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार असतानाच आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रो वननेदेखील आपल्या सेवेच्या तासांत वाढ केली आहे. नव्या वेळापत्रकानुसार, सोमवारपासून वर्सोवा येथून पहिली मेट्रो सकाळी ६.५० वाजता सुटेल. घाटकोपर येथून पहिली मेट्रो सकाळी ७.१५ वाजता सुटेल, तर वर्सोवा येथून शेवटची मेट्रो रात्री ९.५० वाजता सुटेल. घाटकोपर येथून शेवटची मेट्रो रात्री १०.१५ वाजता सुटेल.

रेल्वे प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे व्हावे म्हणून अंधेरी आणि घाटकोपर येथील पादचारी पूलदेखील खुले करण्यात येणार असून, अंधेरी स्थानक येथील मेट्रोचे नवे गेटही खुले करण्यात येतील. यामुळे प्रवाशांना थेट अंधेरी पश्चिम गाठता येईल. मेट्रो सुटण्यापूर्वी मेट्रो स्थानकांची प्रवेशद्वारे १५ मिनिटेआधी उघडण्यात येणार आहेत. दरम्यान, मुंबई मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांचा आकडा वाढत असून, आजघडीला हा आकडा ८० हजारांच्या आसपास आहे.

...........................................