Join us  

उन्हाळ्यापूर्वीच मुंबई तापली; मुंबई ३७ तर ठाणे ४० अंश

By सचिन लुंगसे | Published: February 29, 2024 6:58 PM

मुंबईच्या समुद्रावरून वाहणा-या वा-यामुळे मुंबईचे तापमान नियंत्रित राहते.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील बहुतांशी ठिकाणी गुरुवारी कमाल तापमान ४० अंश नोंदविण्यात आले असून, वाढत्या कमाल तापमानाने मुंबईकरांची लाही लाही केली आहे. विशेषत: सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान पडणारे ऊनं नागरिकांना चटके  देत असून, ही उन्हाळ्याची सुरुवात असेल तर उन्हाळा कसा असेल ? याची कल्पनाच न केलेली बरी...अशा प्रतिक्रिया मुंबईकरांनी वाढत्या तापमानावर दिल्या आहेत.मुंबईच्या समुद्रावरून वाहणा-या वा-यामुळे मुंबईचे तापमान नियंत्रित राहते. मात्र सध्या पूर्वेकडून समुद्राकडे वारे वाहत आहेत. हे वारे समुद्रावरील वा-याला थोपावत आहेत. समुद्रावरून वारे वाहत नसल्याने तापमानात वाढ नोंदविली जात असून, शुक्रवारी मात्र या तापमानात घट होईल. मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशावरून ३२ नोंदविण्यात येईल, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली.आयएमडी, स्थानिक स्तरावरील ऑटोमेटीक वेदर स्टेशनकडून प्राप्त माहितीनुसार, वेगरिज ऑफ दी वेदरने खालील तापमाने दिली आहेत.

कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये...मुंबई ३७.२ठाणे ४०रत्नागिरी ३८चिपळूण ४१कल्याण ४०पनवेल ३९मीरा रोड ३९नवी मुंबई ३८विरार ३८कर्जत ४१बदलापूर ४०मुंब्रा ३९वाशी ३८

टॅग्स :तापमानमुंबई