घाटकोपरचा पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल झुकला, वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 08:25 AM2018-07-08T08:25:56+5:302018-07-08T11:18:44+5:30

घाटकोपरमधील पूर्व व पश्चिम परिसराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Mumbai : Ghatkopar's East-West connecting bridge Closed | घाटकोपरचा पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल झुकला, वाहतूक बंद

घाटकोपरचा पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल झुकला, वाहतूक बंद

googlenewsNext

मुंबई - घाटकोपरमधील पूर्व व पश्चिम परिसराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल खालच्या बाजूनं झुकल्याचा अंदाज महापालिका प्रशासनानं व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून पोलीस व रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आली. पूल धोकादायक स्थितीत असल्याची माहिती मिळताच खबरदारी म्हणून पोलीस व रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधित पूल तातडीनं वाहतुकीसाठी बंद केला आहे. शनिवारी (7 जुलै) रात्रीपासून हा पूल बंद करण्यात आला आहे. 

(आता तरी डोळे उघडा; 'हे' पाहा मुंबईतील धोकादायक पूल! )

दरम्यान, ऑगस्ट 2016 मधील एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरी व 3 जुलैला झालेली अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनांनंतर धोकादायक, कमकुवत, दुरवस्थेत असलेल्या पुलांच्या डागडुजी व देखभालीसंदर्भात शासनास खडबडून जाग झाल्याचे दिसते आहे.

घाटकोपर रेल्वे पुलाच्या पिलरला तडे

(पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा प्रश्न ऐरणीवर)

अंधेरी पूल दुर्घटना, जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

3 जुलैला अंधेरी-विले पार्लेदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली. या घटनेत एकूण पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. यातील जखमी महिला अस्मिता काटकर यांचा शनिवारी (7 जुलै) उपचारादरम्यान मृत्यू झाला. अस्मिता काटकर या पुलाच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले असली तरी त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर शनिवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

दुर्घटनेच्या दिवशी नेमके काय घडले?
नेहमीप्रमाणे अस्मिता काटकर यांनी आपल्या 6 वर्षीय मुलाला अंधेरी पूर्वेकडील परांजपे विद्यालयात सोडले व कामासाठी गोखले पुलावरून जुहूच्या दिशेने त्या पायी प्रवास करू लागल्या. काही समजण्याच्या आतच गोखले पुलाचा काही भाग कोसळला आणि ढिगा-याखाली त्या अडकल्या. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून अस्मिता काटकर यांची मृत्यूशी झुंज सुरू होती.
ढिगा-याखाली अडकल्याने अस्मिता काटकर गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यांचे संपूर्ण शरीर सुजले होते. त्यांच्या डोक्यालादेखील गंभीर दुखापत झाल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते. अखेर साडीच्या आधारावर अस्मिता यांची ओळख पटवण्यात आली होती.

Web Title: Mumbai : Ghatkopar's East-West connecting bridge Closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.