Join us  

मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ४०९ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. साेमवारी दिवसभरात ४८१ रुग्ण बरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. साेमवारी दिवसभरात ४८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २ लाख ८४ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ६,६७६ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा काळ ४०९ दिवसांवर पोहोचला आहे.

सोमवारी ३९५ रुग्ण आणि ७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या ३ लाख ३ हजार १४८ झाला, तर मृत्यूंचा आकडा ११ हजार २४९ झाला आहे. मुंबईत मागील २४ तासांत पालिकेच्या आरोग्य विभागाने १ हजार ९१३ अतिजोखमीचे आजार असणाऱ्या सहवासितांचा शोध घेतला. मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १३३ इतकी आहे, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २ हजार २४८ आहे. आतापर्यंत कोरोनाच्या २६ लाख ८ हजार ९३० चाचण्या झाल्या आहेत.

......................