Join us  

मुंबई - मध्य प्रदेश सामना अनिर्णीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 7:29 AM

फलंदाजांनी केलेल्या संथ खेळीमुळे निरस झालेला मुंबई - मध्य प्रदेश यांच्यातील रणजी सामना अखेर अनिर्णीत राहिला. ‘क’ गटात झालेल्या या लढतीत मध्य प्रदेशने पहिल्या डावात ४०९ धावा काढल्यानंतर

मुंबई : फलंदाजांनी केलेल्या संथ खेळीमुळे निरस झालेला मुंबई - मध्य प्रदेश यांच्यातील रणजी सामना अखेर अनिर्णीत राहिला. ‘क’ गटात झालेल्या या लढतीत मध्य प्रदेशने पहिल्या डावात ४०९ धावा काढल्यानंतर मुंबईने सोमवारी पहिला डाव ८ बाद ४४० धावांवर घोषित करून ३ गुण निश्चित केले होते.एमराल्ड हाइट्स आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईकरांनी नियंत्रित मारा करून यजमानांना मर्यादेत रोखल्यानंतर ३१ धावांची नाममात्र आघाडी घेत ३ गुण निश्चित केले. अनुभवी फलंदाज नमन ओझा याने १८० धावांची शानदार खेळी करून मध्य प्रदेशला समाधानकारक मजल मारून दिली. यानंतर, जय बिस्त (१३५), कर्णधार सूर्यकुमार यादव (९१) आणि सिद्धेश लाड (८२) यांच्या जोरावर मुंबईकरांनी आघाडी घेण्यात यश मिळवले. परंतु, यजमानांच्या फलंदाजांनी खूप संथ खेळी केल्याने सामना दुसºया दिवसअखेरच अनिर्णीत अवस्थेकडे झुकला.मुंबईकरांनी काहीसा आक्रमक पवित्रा घेत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र,चौथ्या दिवशी त्यांनीही संथ खेळी करत १८.४ षटकांत केवळ २५ धावा काढल्या.दुसºया डावात मध्य प्रदेशची सुरुवात अडखळती झाली. अर्धा संघ ६६ धावांत परतल्यानंतर त्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला. अखेर पंचांनी सामना अनिर्णीत राखण्याचा निर्णय घेतला तेव्हा यजमानांनी ५९ षटकांत ६ बाद १४५ धावा केल्या होत्या.दुसºया डावात मध्य प्रदेशकडून ओझाने १२३ चेंडूंत ३८ धावा केल्या, तर अंकित शर्माने ८८ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ५२ धावांची खेळी केली. मुंबईकडून मिनाद मांजरेकर, रॉयस्टन डायस यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. पदार्पण करणाºया आकाश पारकरने संपूर्ण सामन्यात ५ बळी घेत आपली चमक दाखवली.संक्षिप्त धावफलकमध्य प्रदेश (पहिला डाव) : (नमन ओझा १८०, अंकित शर्मा ६७, वसीम अहमद ४०, अंकित खुशवाह ३४, मिहिर हिरवानी ३१, शुभम शर्मा २३; आकाश पारकर ४/७०, रॉयस्टन डायस २/५७, विजय गोहिल २/८३, जय बिस्त १/४९, अभिषेक नायर १/५७) आणि (दुसरा डाव) : (अंकित शर्मा नाबाद ५२, नमन ओझा ३८, शुभम शर्मा २९, रजत पाटीदार १२; विजय गोहिल २/३०, मिनाद मांजरेकर २/३३, आकाश पारकर १/११, रॉयस्टन डायस १/२६) अनिर्णीत वि. मुंबई (पहिला डाव) : (जय बिस्त १३५, सूर्यकुमार यादव ९१, सिद्धेश लाड ८२, सुफियान शेख ४२, आकाश पारकर २१; अखिल हेरवाडकर १७; शुभम शर्मा २/८, मिहिर हिरवानी २/१०५, अंकित शर्मा २/११९, इश्वर पांड्ये १/६४, अंकित खुशवाह १/६५, चंद्रकांत सकुरे १/७१).

टॅग्स :क्रिकेट