Join us  

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३२६ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:05 AM

मुंबई : मुंबईत शनिवारीही रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. शहर उपनगरात १ हजार ८२७ ...

मुंबई : मुंबईत शनिवारीही रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. शहर उपनगरात १ हजार ८२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६ लाख ५१ हजार २१६ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. त्यामुळे मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२६ दिवसांवर पोहोचला आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

मुंबईत सध्या २८ हजार ५०८ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर उपनगरात दिवसभरात १२९९ रुग्ण आणि ५२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ९६ हजार ३७९ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १४ हजार ५७४ झाला आहे.

१५ ते २१ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत दिवसभरात रुग्णांचा शोध घेण्यासाठी २९ हजार २६४ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ६० लाख ४८ हजार ६८६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या शहर उपनगरातील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ६२ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २४६ इतकी आहे.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढल्याने दिलासा

कालावधीदिवस

२२ मे ३२६

२१ मे ३१७

२० मे २९७

१९ मे २६९

१८ मे २५५

१७ मे २४६