Join us  

मुंबईकरांनो, ‘मर्कटलीलां’कडे दुर्लक्ष नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:16 AM

वाघ, बिबट्या, साप, हरण अशा प्राण्यांबाबत लोक, माध्यमे आणि प्राणिप्रेमी खूप उत्साहाने बोलतात, लिहितात, कामे करतात. पण त्या तुलनेने माकडांबाबत उत्साह दिसून येत नाही. जगभर १४ डिसेंबर रोजी ‘मंकी डे’ साजरा होणार आहे.

- अक्षय चोरगेमुंबई : वाघ, बिबट्या, साप, हरण अशा प्राण्यांबाबत लोक, माध्यमे आणि प्राणिप्रेमी खूप उत्साहाने बोलतात, लिहितात, कामे करतात. पण त्या तुलनेने माकडांबाबत उत्साह दिसून येत नाही. जगभर १४ डिसेंबर रोजी ‘मंकी डे’ साजरा होणार आहे. तथापि, देशात आणि मुंबईतही फारच थोड्या संस्था अथवा प्राणिप्रेमी हा दिवस साजरा करतात. त्यामुळे माकड हा प्राणी अन्य प्राण्यांच्या तुलनेत दुर्लक्षित राहिल्याचेच दिसत आहे. विशेष म्हणजे माकडांची संख्या मुंबईत खूपच अधिक असून ही संख्या वाढतच आहे.संजय गांधी राष्टÑीय उद्यान आणि मुंबईजवळच्या सर्वच टेकड्या, कांदळवन, डोंगरांमध्ये सर्वत्र माकडांचा वावर आहे. अनेकदा माकडे शहरी भागात शिरकाव करतात, हैदोस घालतात. दिल्लीसारख्या शहरात तर माकडांमुळे अनेकदा दहशत पसरल्याची स्थिती निर्माण होते. एरवी माकडांच्या उपद्रवाकडे ‘मर्कटलीला’ म्हणून पाहण्यात येत असले, तरी जंगलातील अन्न साखळीत मोलाची भूमिका निभावणाºया माकडांना आता सुरक्षेची गरज आहे. सन २००० सालापासून जगभरातील विविध देशांमध्ये १४ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक माकड दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. हा दिवस पाश्चिमात्य देशांत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आपल्या देशात त्यास पुरेशी प्रसिद्धी मिळालेली नाही. पाश्चिमात्य देशांत या दिवसाचे मोठे सेलिब्रेशन होते, तर आपल्याकडे जनजागृतीवर भर दिला जातो.कसा साजरा होतो मंकी डे?माकडांबाबत समाजात, लोकांमध्ये जनजागृती करणे. माकडांची अनधिकृत खरेदी-विक्री थांबविण्यासाठी प्रयत्न करणे. माकडांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवणे. गेल्या काही वर्षांपासून माकड आणि मानव यांच्यामधील संघर्ष वाढत आहे. त्यास आळा बसेल, यासाठी आवश्यक उपक्रम राबवणे, अशा विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस देशभर साजरा होतो.मुंबईत कुठे साजरा होतो?ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे नरिमन पॉइंटवरील एअर इंडिया इमारतीसमोर जागतिक माकड दिन साजरा होणार आहे. या वेळी विविध उपक्रम आणि जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच काही प्राणिप्रेमी संजय गांधी राष्टÑीय उद्यान, आरे कॉलनी आणि ठाणे परिसरात माकडांबाबत जनजागृती शिबिरे राबवतात.2500 माकडांवर अत्याचारठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दोन वर्षांपूर्वी मुंबई-ठाणे परिसरात माकडांबाबत सर्वेक्षण करण्यात आले. यात असे आढळले की, मुंबई-ठाण्यात तब्बल दीड हजारांहून अधिक मदारी आहेत. त्यांच्याकडे अडीच हजारांहून अधिक माकडे आहेत. पैशांसाठी या माकडांवर दररोज अनन्वित अत्याचार केले जातात.मदा-यांकडून होणारा छळ थांबवा?मदाºयांकडून माकडांचा भीक मागण्यासाठी, पैसे कमविण्यासाठी छळ केला जातो. त्यासाठी माकडांकडून शारीरिक मेहनत करून घेतली जाते. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कसरती करून घेतल्या जातात. अनेकदा माकडांना चाबकाने फटके मारले जातात. माकडांचा हा छळ कधी थांबणार, असा सवाल जागतिक माकड दिनाच्या निमित्ताने प्राणिप्रेमींनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.माकडांची संख्या वाढतीच!मुंबईसह अनेक शहरांमध्ये माणसांप्रमाणे माकडांची संख्याही वाढत आहे. दिल्लीतही माकडांची संख्या खूप मोठी आहे. तेथील वनविभागाने ही परिस्थिती योग्यरीत्या हाताळली नाही, तर दिल्लीप्रमाणे मुंबईची स्थिती होईल.३ ते ८ हजार रुपयांना विक्रीमाकडांची तीन ते आठ हजार रुपयांना विक्री होते, अशी धक्कादायक माहिती प्राणिप्रेमींनी दिली. मदाºयांकडून माकडांची खरेदी-विक्री सर्रास चालते. संजय गांधी राष्टÑीय उद्यान, आरे कॉलनी परिसरातील समाजकंटक जंगलातील माकडांना पकडून ती मदारी अथवाइतरांना विकतात, अशीही माहिती समोर येत आहे.पालन-पोषणाची बोंबमदारी माकडांचा वापर करून स्वत:चे पोट भरतात. मात्र त्यांच्याकडे असणाºया माकडांच्या पोषणाकडे लक्ष देत नाहीत. जंगलात राहणारी माकडे ही मदाºयांकडे असणाºया माकडांपेक्षा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असतात, ही बाब ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सर्वेक्षणात समोर आली आहे.संरक्षक कायदे वन्यजीव संरक्षण कायदा १९७२च्या कलम ९, ३९, ४० (२), ४९ ब, अन्वये माकडांची शिकार करणे, पाळणे, माकडांचे प्रजनन घडवून आणणे, माकड घेऊन प्रवास करताना आढळल्यास दंड अथवा एक ते सहा वर्षांची शिक्षा होऊ शकते. किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच ‘प्रिव्हेंन्शन आॅफ क्रुएलिटी टू अ‍ॅनिमल्स, १९६०’च्या कलम ११ अन्वये माकडांना मारणे, त्रास देणे, अत्याचार करणे गुन्हा आहे.(दोन्ही कायद्यांत माकडांसोबतइतरही प्राण्यांचा समावेश आहे)माकडे शहरात का येतात?माकडे भुकेमुळे जंगलातून शहरात अथवा मानवी वस्ती असलेल्या भागात शिरकाव करतात, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु हा समज अत्यंत चुकीचा असून माकड हा बुद्धिवान प्राणी असल्यामुळे तो कुतूहलापोटी मानवी वस्तीकडे वळतो, असे मत प्राणिप्रेमी मांडतात. तसेच माकड अथवा कोणतेही प्राणी मानवी वस्तीत शिरकाव सहसा करत नाहीत. याउलट मानवाने प्राण्यांच्या वस्तीत (जंगलांमध्ये शिरकाव केला आहे) अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मानवाचे जंगलांवरील अतिक्रमण हेही एक महत्त्वाचे कारण आहे.वनविभाग निष्क्रियमाकडांबाबत वन विभाग निरुत्साही असल्याचे पाहायला मिळते. शहरात शिरकाव केलेल्या माकडांना पकडण्यासाठी वन विभागाकडे विशेष पिंजरे नाहीत. वन विभागाकडे मुंबईत, ठाण्यात, संजय गांधी राष्टÑीय उद्यानात किती माकडे आहेत याबाबत कोणतीच माहिती नाही. मुंबईत माकडांच्या किती प्रजाती आहेत याचीही कोणतीच माहिती नाही. वनविभागाकडून याबाबत कधी सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही.प्रशासन निरुत्साहीमुंबईत वनविभागाकडून, स्थानिक प्रशासनाकडून माकडासारख्या दुर्लक्षित प्राण्यासाठी काहीच केले जात नाही. प्राणिप्रेमी मात्र उत्साहाने काम करतात. परंतु त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. मी आणि माझे मित्र दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करतो.- कौस्तुभ दरवेस, मुख्य संरक्षक, ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमाकडांसाठीही आम्ही कार्यरतविविध प्राण्यांसाठीचे विविध दिवस साजरे केले जातात. मी व माझे सहकारी माकड दिन साजरा करत नाही. परंतु वर्षभर इतर प्राण्यांप्रमाणे माकडांसाठीही विविध कामे करतो. माकडांच्या तस्करीविरुद्ध आम्ही अनेकवेळा वनविभागासोबत विविध कामे केलेली आहेत. वनविभागाने पुढाकार घेऊन माकड दिनानिमित्त जर काही उपक्रम योजले तर मी व माझे सहकारी नक्कीच त्यात सहभागी होऊ.- सुनीश कुंजू, सचिव, प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी

टॅग्स :माकडमुंबई