Mumbai Building Collapse: खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळल्याने एका चिमुकलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 06:04 PM2019-09-24T18:04:31+5:302019-09-24T18:52:27+5:30

खार रोड पश्चिममधील पूजा अपार्टमेंट या पाच मजली इमारतीचा काही भाग खार रोड क्र. 17वरील रस्त्यावर  कोसळ्याने एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. 

Mumbai Building Collapse: One small girl dies after collapse of a five floor building in Khar road | Mumbai Building Collapse: खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळल्याने एका चिमुकलीचा मृत्यू

Mumbai Building Collapse: खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळल्याने एका चिमुकलीचा मृत्यू

Next

मुंबई: खार रोड पश्चिममधील पूजा अपार्टमेंट या पाच मजली इमारतीचा काही भाग खार रोड क्र. 17वरील रस्त्यावर  कोसळ्याने एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे. 

खार रोड पश्चिम येथील पूजा अपार्टमेंट या पाच मजली इमारतीच्या जिन्याचा भाग आज(मंगळवारी) दुपारी 1.15च्या सुमारास कोसळला होता. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 10 वर्षाची माही मोटवाणी अडकली होती. माहीला ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर तात्काळ लिलावती रुगणालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. तसेच सुरेखा भानुसाहेब लाेखंडे (स्त्री/ 40 वर्षे ) आणि भावना वसंत आंचन (स्त्री/ 50 वर्षे) जखमी झाले असून त्यांना भा.भा. रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच रहिवाश्यांना इमारतीतून बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरु आहे.

Web Title: Mumbai Building Collapse: One small girl dies after collapse of a five floor building in Khar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.