Mumbai Building Collapse: मालाडमध्ये इमारत कोसळली; जखमींची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 01:27 PM2021-06-10T13:27:58+5:302021-06-10T13:29:47+5:30

Mumbai Building Collapse: मुंबईतील इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू; ७ जण जखमी

Mumbai Building Collapse: Building collapses in Malad; Chief Minister Thackeray at the hospital to inquire about the injured | Mumbai Building Collapse: मालाडमध्ये इमारत कोसळली; जखमींची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात

Mumbai Building Collapse: मालाडमध्ये इमारत कोसळली; जखमींची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात

googlenewsNext

मुंबई: पश्चिम उपनगरातील मालाडच्या पश्चिमेला असलेल्या मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन विचारपूस केली. 

मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम परिसरातील मालवणी भागात इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ८ लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत ७ जण जखमी झाले. त्यांच्यावर कांदिवली परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपचार घेत असलेल्या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Mumbai Building Collapse: Building collapses in Malad; Chief Minister Thackeray at the hospital to inquire about the injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.