लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पहाटे पडलेल्या मुसळधार पावसाने महामार्गावर ससूनवघर-मालजीपाडा परिसरात पाणी साचून राहिल्याने, मुंबई-अहमदाबाद हायवेवरील वाहतूक दुपारपर्यंत विस्कळीत झाली होती. मालजीपाडा-ससूनवघर परिसरातील जमिनीवर भराव घातल्याने पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे मुसळधारर पावसात हायवेवर गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असून वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्यात
By admin | Updated: July 2, 2017 04:30 IST