Join us

खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला तौक्ते चक्रीवादळग्रस्त मढ कोळीवाड्याचा पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:06 IST

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज मढ कोळीवाड्याचा पाहणी दौरा केला. यावेळी भाजप मुंबई सचिव विनोद शेलार ...

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज मढ कोळीवाड्याचा पाहणी दौरा केला. यावेळी भाजप मुंबई सचिव विनोद शेलार उपस्थित होते.

खासदार गोपाल शेट्टी पोहोचताच महिला रोजीरोटी गेल्यामुळे टाहो फोडून ढसाढसा रडू लागल्या. त्यांना धीर देत मत्स्य व्यवसाय खात्याचे परवाने अधिकारी अशोक जावळे यांच्याकडे चौकशी केली असता येथील सुमारे ७० मासेमारी नौकांचे पंचनामे केले असून, बहुतांश नौकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना दिली.

यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी संयुक्तपणे नौका उभारण्यासाठी प्रयत्न करू. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून येथील मच्छीमारांना मदत करण्याची मागणी करण्यात येईल. तसेच विमा कंपनी असतील त्यांनीदेखील पळवाट काढू नये. याकरिता राज्य व केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे आश्वासन खासदार गोपाळ शेट्टी यांनी यावेळी दिले.------------------------ - - - - ----