Join us  

लाकडी ताट, वाटी, चमच्यांची चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 2:35 AM

घरातील पूजा असो वा वाढदिवस, कोणत्याही सण-समारंभांत हमखास वापरले जाणारे थर्माकॉल आणि प्लॅस्टिकच्या ताट, वाट्या, ग्लास आणि चमच्यांवर शनिवारपासून बंदी आली आहे.

चेतन ननावरेमुंबई : घरातील पूजा असो वा वाढदिवस, कोणत्याही सण-समारंभांत हमखास वापरले जाणारे थर्माकॉल आणि प्लॅस्टिकच्या ताट, वाट्या, ग्लास आणि चमच्यांवर शनिवारपासून बंदी आली आहे. मात्र, या प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंची जागा आता बाजारात कागदापासून व लाकडापासून तयार केलेल्या पर्यायी वस्तूंनी घेतली आहे. ग्राहकांची या वस्तूंना पसंती मिळत असली, तरी प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या तुलनेत दुप्पटीने महाग असलेल्या पर्यायी वस्तू खरेदी करताना ग्राहक आखडता हात घेत आहेत.प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या ताट, वाटी, चमच्यांवर घातलेल्या बंदीमुळे बहुतेक दुकानदारांना नुकसानाला सामोरे जावे लागलेआहे. मात्र, धंदा सुरू ठेवण्यासाठी दुकानदारांनी दुकानात प्लॅस्टिकला पर्याय असलेल्या व कागदापासूनतयार केलेल्या डिश, वाट्या, ग्लास यांचा भरणा केलेला आहे. कागदाशिवाय लाकूड व पुठ्ठ्यापासून तयार केलेल्या ताट, वाट्या, चमचे यांचा पर्यायही ग्राहकांना उपलब्ध आहे. महत्त्वाची बाब म्हणजे,अगदी स्वस्तात मिळणाऱ्या प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंच्यातुलनेत कागदी आणि लाकडीवस्तू दुप्पटीने महाग असल्याचेही अजीम सय्यद या दुकानदाराने सांगितले.प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंच्या तुलनेत पर्यायी वस्तूंच्या किमती दुप्पटीने महाग असल्याने तूर्तास तरी ग्राहक चौकशी करून जात असल्याचे शादमान कुरेशी या विक्रेत्याने सांगितले. कुरेशी म्हणाले की, प्लॅस्टिकबंदीमुळे आधीच कंबरडे मोडले आहे. गेल्या १५ दिवसांपासून धंदा बसला आहे. प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू स्वस्त असल्याने, लोक पिकनिक, पूजा, लग्न-समारंभ, वाढदिवस अशा विविध प्रसंगांसाठी मोठ्या संख्येने प्लॅस्टिक किंवा थर्माकोलच्या ताट, वाट्या, चमचे, ग्लास अशा विविध आवश्यक वस्तू घेऊन जात होते. मात्र, बंदीनंतर कागद आणि लाकडाच्या वस्तू घेताना ग्राहक हात आखडता घेत आहेत. किमती अधिक असल्यामुळे केवळ ताट आणि ग्लासला मागणी आहे.याउलट चमचे आणि वाट्या घेताना ग्राहकांना विचार करावा लागत आहे. मोठमोठी मंडळेही अद्याप चौकशी करून जात असून, नेहमीचे गिºहाईकही तुलनेने कमी वस्तूंची खरेदी करत आहेत. त्यामुळे लोकांना नव्या पर्यायांची सवय लागेपर्यंत आणखी नुकसान सहन करावे लागण्याची शक्यताही कुरेशी यांनी व्यक्त केली.ग्लासच्या किमती अडीच पटीने महाग२० रुपयांत २०० मिली क्षमतेचे ५० नग प्लॅस्टिकचे ग्लास पूर्वी मिळत होते. मात्र, प्लॅस्टिकला पर्याय असलेल्या कागदी स्वरूपातील ५० ग्लाससाठी ग्राहकांना ५० रुपये खर्च करावे लागत आहेत.अ‍ॅल्युमिनियम फॉइल कंटेनरचा पर्यायहॉटेल आणि रेस्टॉरन्टमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणाºया प्लॅस्टिक व थर्माकोलच्या कंटनेरसाठी अ‍ॅल्युमिनियम फॉइल कंटेनरचा पर्याय बाजारात उपलब्ध आहे. मात्र, या कंटेनरच्या १०० नगांसाठी ग्राहकांना तब्बल २२० रुपये मोजावे लागणार आहेत.पिशव्यांच्या किमतीत सातपट वाढ२० रुपयांत १०० प्लॅस्टिक पिशव्या घेणाºया ग्राहकांना कागदी पिशव्यांच्या १०० नगसाठी तब्बल १४० रुपये मोजावे लागत आहेत. प्लॅस्टिकच्या तुलनेत कागदी पिशव्यांसाठी तब्बल सातपट पैसे मोजावे लागत आहे.